टरबूज/खरबूज लागवडीसाठी महत्वाच्या टिप्स
शेतकरी टरबूज व खरबूज लागवड मोठ्या संख्येने करत आहेत. परंतु बऱ्याचदा अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नाही. पिकाच्या उत्तम वाढीसाठी व जास्त उत्पादनासाठी पिकाची लागवड करतांना दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण आज काही महत्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.
१. रोपाची लागवड करण्यापूर्वी मल्चिंग पेपर वर छिद्र केलेल्या जागी माती भरावी.
२. पिकाच्या चारही बाजूस मोहरी ची लागवड करावीत. जेणेकरून मधमाशी आकर्षित होईल.
३. फळमाशीचा मशिकारी ट्रॅप लावावा.
४. या पिकाची लागवड हिवाळ्यात केली असेल तर पिकास रात्री किंवा सकाळी ७ वाजण्यापूर्वी पाणी द्यावे.
५. आंतरपीक म्हणून भेंडी , भुईमूंगची लागवड करू नये.
६. २५ – ३० एकरी पिवळे , निळे सापळे लावावेत.
७. यांची रोपे करूनच लागवड करावीत.