मोहरीचे उत्पादन घेणे कितपत आहे फायदेशीर

Shares

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जवळ जवळ रोजच आहारात आपण मोहरीचा वापर करत असतो. मग फोडणी साठी मोहरी म्हणा किंवा मोहरीचे तेल म्हणून म्हणा . मोहरीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मोहरीची मागणी ही बाराही महिने असते . मोहरीचे पीक तुम्ही आलटून पालटून घेतले पाहिजे.

जमीन आणि हवामान –
१. मोहरी लागवडी मध्यम ते भारी जमिनीमध्ये घेता येते.
२. थंड आणि कोरड्या हवामानात मोहरीचे पीक घेतले जाते.
३. पेरणीच्या वेळेस तापमान हे १६ – २२ अंश सें/ग्रे पर्यंत असावे त्या पेक्षा जास्त नसावेत .
४. उत्तम वाढीसाठी तापमान जवळ जवळ १८-२५ अंश सें/ग्रे असावेत.

पूर्वमशागत –
१. तीन वर्षातून एकदा नांगरट जमीन करणे गरजेचे आहे .
२. दोन कुळवाच्या पाळ्या
पेरणीची वेळ आणि अंतर –
१. सर्वात उत्तम पेरणीसाठी वेळ म्हणजे ऑक्टोंबरचा पहिला पंधरवडा .
२. ४५ X १५ सें.मी पर्यंत अंतर असणे आवश्यक आहे .

बियाणे –
पाच किलो बियाणे प्रति हेक्टर पर्यंत

उत्पादन –
१. जर बागायती असेल तर १२-१५ क्विंटल प्रति हेक्टर.
२. कोरडवाहू असेल तर ८-१० क्विंटल प्रति हेक्टर.

भुईमुगानंतर मोठ्या प्रमाणावर घेतले जाते पीक मोहरी आहे . मोहरीचे उत्पादन घेणाऱ्यांची संख्या जास्त जरी असली तरी त्याची मागणी देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे . अनेक कंपन्या मोहरीची मागणी करत असतात . तुम्ही मोहरीचे उत्पादन घेतले तर नक्कीच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल .

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *