आरोग्य

Summer Special : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्या नारळपाणी

Shares

उन्हाळ्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते. उन्हाळ्याच्या उष्णतेचा सामना करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करत असतात, ज्यामध्ये कूलर, पंखा, एसी अशा वस्तूंचा समावेश असतो. त्याशिवाय कार्बोनेटेड पेये, फळांचे रस, आमरस, लस्सी आणि इतर अनेक पेयांचा अवलंब करत असतात. तर या पेयांपैकी सगळ्यांच्या आवडते पेय म्हणजे नारळपाणी.

नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमची तहान भागण्यासोबत त्या नारळातील पोषक तत्वांमुळे शरीराला फायदादेखील होतो. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला आतून गार ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायचा सल्ला सगळेच देत असतात. तसेच हे प्यायल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीरातील काही अंतर्गत त्रास नाहीसे होतात.आपल्या शरीराला दररोज किमान २,६०० मिलीग्रॅम ते कमाल ३,४०० मिलीग्रॅम पोटॅशियमची आवश्यकता असते. एका नारळामध्ये सुमारे ६०० मिलीग्रॅम पोटॅशियम उपलब्ध असते.

हे ही वाचा (Read This) summer special : उष्मघातापासून संरक्षण करणारे कैरीचे आरोग्यदायी पन्हे

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये रक्तदाब कमी करण्यास मदत करते.नैसर्गिकरित्या येणारे नारळ पाणी सर्व गोड पदार्थांपासून मुक्त असते.

जर एखाद्याला क्रोनिक किडनीचा आजार किंवा डायबिटीज यासंबंधित आजार असल्यास मग अशा व्यक्तींनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतरच नारळ पाण्याचे सेवन करावे.

उन्हाळ्यात, टॅनिंग काढून टाकण्यासाठी आपण नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुवू शकता. यामुळे टॅनिंग कमी होते आणि चेहरा थंड होतो.

वजन कमी करणे आणि रि-हायड्रेशन यांसाठी नारळ पाणी हे सर्वात उत्तम पर्याय मानला जातो.मूतखडा किंव किडनी स्टोन्सची समस्या असल्यास डाॅक्टर लिक्विड वस्तूचे सेवन करण्याचा सल्ला देतात. मग अशा वेळी नारळ पाणी फायदेशीर ठरु शकते.

नारळ पाणी हे ब्लड शुगर लेवल कमी करत असते, असे संशोधनामार्फत सिद्ध झाले आहे.

पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो.

नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे पोषक असतात. यामुळे तुमचे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

नारळाचे पाणी चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास देखील मदत करते. आपण फेसपॅक म्हणून देखील याचा वापर करू शकता.

हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *