इतर बातम्या

उन्हाळी सोयाबीन जोमात, शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील प्रश्न मिटला

Shares

यंदा सोयाबीनचा पेरा विक्रमी झाला असून मोठ्या प्रमाणात सॊयाबीन बहरतांना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भविष्याची चिंता मिटली आहे.

उन्हाळी सोयाबीनचा पेरा मोठ्या संख्येने झाल्यामुळे खरिपातील बियाण्यांची चिंता मिटली असून शेतकऱ्यांची धावपळ कमी होणार आहे. इतकेच काय तर बियाण्यांची खरेदी करतांना होत असलेली फसवणूक टळणार आहे.

घरगुती बियाणे वापरण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे प्रमाणित आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी लागणार आहे. यंदा कृषी विभागाने जनजागृती केली होती तर वातावरण देखील पोषक असे होते. त्यामुळे सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र आता सोयाबीनची किती विक्री होईल हे पाहण्यासारखे आहे.

हे ही वाचा (Read This) प्रधान मंत्री मोफत सोलार पॅनल योजना २०२२, योजनेसाठी असा करा अर्ज

बियाण्यांचा प्रश्न मिटणार परंतु उत्पादकता कमी

यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करून हरभरा आणि सोयाबीन या पिकावर जास्त भर दिला आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी केल्यानंतर प्रति एकरी ४ क्विंटल ते ५ क्विंटल उत्पादन मिळत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी पाहिलांदाच असा प्रयोग केल्यामुळे काही चुका झाल्या मात्र ज्या शेतकऱ्यांनी भोदावर लागवड केली आहे त्यांना अधिकचे उत्पादन घेता आले आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा (Read This) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

खरीप हंगामात काय होती सोयाबीनची स्थिती?

खरीप हंगामामध्ये सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. या पिकांमध्ये सर्वात मोठा फटका हा सोयाबीन पिकांना बसला होता. त्यामुळे खरिपामध्ये झालेले नुकसान रब्बी मध्ये भरून काढण्याचा निश्चय शेतकऱ्यांनी केला होता. त्यात मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे असे करणे शक्य झाले आहे.

अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना ज्वारीची लागवड करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली असून त्यांना या प्रयोगामध्ये यश मिळाले आहे.

सोयाबीनची सध्याची स्थिती …

उन्हाळी हंगामातील सोयाबीनला लवकरच शेंगा लागणार आहेत. उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग हा कमी क्षेत्रात पाण्याची उपलब्धता बघून केला आहे.

शेतकऱ्यांनी स्प्रिक्लंर, ठिबकचा वापर करून पिकाची जोपासना केली आहे. सोयाबीनला मुबलक दर मिळाले नाही तरी भविष्यातील बियाण्यांचा प्रश्न मिटणार आहे.

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *