इतर बातम्याबाजार भाव

सोयाबीनला जास्तीतजास्त ७ हजार ४०० तर कमीतकमी ४ हजार ५००

Shares

गेल्या २ दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काढणी, मळणी आणि लगेचच विक्री असे धोरण केले होते. त्यामुळे बाजारसमितीमध्ये आवक वाढल्याचे चित्र दिसून येत होते.

सोयाबीनच्या दराची चर्चा ही सुरुवातीपासूनच होत होती. मात्र आता शेवटचा टप्पा आला तरी ही चर्चा काही संपली नाही . याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या दरामध्ये सतत होणारी चढ उतार.

हे ही वाचा (Read This) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

पुन्हा दरात स्थिरता

गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली होती. मात्र नंतर दरामध्ये घसरण होऊन दर हे ७ हजार ४०० वर स्थिर होते, मग पुन्हा दरात ७० रुपयांची वाढ झाली होती. मात्र आता सोयाबीनचे दर हे सोयाबीनला जास्तीतजास्त ७ हजार ४०० तर कमीतकमी ४ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.

हे ही वाचा (Read This) आधुनिक शेतीसह जैविक शेती ही काळाची गरज

सोयाबीनचे आजचे दर

soybean rate

सरकारने घेतला सोयाबीन आणि कापूस बाबत महत्वाचा निर्णय

कापूस आणि सोयाबीनची लागवड मराठवाड्याबरोबर विदर्भात देखील मोठ्या संख्येने केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने मूल्य साखळी विकासासाठी ३ वर्षात एक १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली.

हे ही वाचा (Read This) जमिनीची कस म्हणजे तिचा कर्ब

निसर्गाचा पुन्हा प्रकोप ?

खरीप हंगामात अवकाळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हे सर्वांनाच माहिती आहे. आता २ दिवसापूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे आता निसर्ग पुन्हा त्याचा प्रकोप दाखवणार की काय असे वाटत होते.

बदललेल्या वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीमाल हा नुकसान टाळण्यासाठी विक्रीस काढला होता. त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र गर्दी दिसत होती.

मात्र आता वातावरण पुन्हा चांगले झाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *