सोयाबीन साठवणूक की विक्री? शेतकऱ्यांना पडला प्रश्न.
मागील काही महिन्यांपासून सोयाबीन शेतकरी संभ्रमात होता. मात्र ५ दिवसांपासून सोयाबीनची आवक सुरळीत सुरु असून सोयाबीनच्या दरात चांगली स्थिरता होती. परंतु आता पुन्हा सोयाबीन दरात घसरण होतांना दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक असा प्रश्न उभा राहत आहे. मागील ५ दिवसांमध्ये सोयाबीन दरात ४०० रुपायांनीं वाढ झाली त्यामुळे सोयाबीन ६ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. आता या दरात घसरण होतांना दिसून येत आहे. मात्र तूर खरेदी केंद्र सुरु होणार असून तुरीला ठरवलेला हमीभाव मिळणार असल्यामुळे तूर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
सोयाबीन दरातील चढ उतार
मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर झाले होते. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीच्या तयारीमध्ये होता. लातूर कृषी उत्पन्न बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढली असून ८ हजार पोत्यांची आवक १५ हजार पोत्यांवर गेली होती. आता उन्हाळी हंगाम सुरु होईल या हंगामात सोयाबीनचे दर अधिक खालावण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. कारण एकाच दिवसाचं सोयाबीनच्या दरात १५० रुपयांनी घसरण झाली आहे. याचा आठवडी बाजारामध्ये जास्त परिणाम होणार आहे असे निदर्शनास येत आहे.
हे ही वाचा (Read This Also ) पोत्यातील नवीन पीक पद्धत, मिळवा भरघोस उत्पन्न !
इतर शेतीमालाचे दर
लातूर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढरी तूर ५८४१ रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन ६३६० रुपये प्रति क्विंटल , चणा ४६०० रुपये प्रति क्विंटल , मूग ६२०० प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळत आहे.