सोयाबीनचे दर ४ महिन्यानंतर दुपटीने
एकीकडे रब्बीतील सोयाबीन पीक शेतामध्ये बहरतांना दिसत आहे तर दुसरीकडे खरिपातील सोयाबीन अंतिम टप्प्यात असतांना त्याच्या दरात वाढ झाली आहे.हंगामाच्या सुरवातीच्या दराची तुलना केली तर आज सोयाबीनच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन हे ६ हजार २०० रुपयांवर स्थिरावले होते. मात्र आता सोयाबीनचे दर हे ७ हजार ४० वर येऊन पोचले आहे.
खरीप हंगामातील बियाण्यांची काळजी मिटली
वातावरणातील बदलामुळे पिकावर झालेला थोडा परिणाम सोडला तर सोयाबीन शेतात जोमात बहरतांना दिसत आहे. खरीप हंगामात बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होते. अश्या वेळेस बियाण्यांचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे कृषी विभागाने यंदा बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी सोयाबीनचा पेरा करण्याचे अवाहन केले होते.
सध्या सोयाबीनला पोषक असे वातावरण आहे. मात्र सोयाबीनच्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे कारण उन्हाळी सोयाबीनची उपयुक्तता कमी असते.
हे ही वाचा (Read This ) PM Kisan सन्मान निधी योजनेत २ महत्वाचे बदल, होळीनंतर जमा होणार ११ वा हफ्ता
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली मागणी
यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून चक्क सर्वात जास्त सोयाबीनचे पीक घेतले जाणाऱ्या ब्राझील मध्ये देखील उत्पादनात खूप घट झाली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढली आहे. तेलाच्या दरात झालेल्या दरवाढीचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला असल्याचा सांगण्यात येत असला तरी शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा, काय घ्यावी काळजी ?