सोयाबीनचे दर लवकरच ९ ते १० हजारांवर जाणार? काय आहे कारण वाचा.
सोयाबीनच्या दरात सुरुवातीपासून चढ उतार पाहायला मिळाला असला तरी आता मात्र सोयाबीनच्या दराने तेजी पकडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर हे दर चढेच राहण्याची दाट शक्यता आहे.
शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दर वाढीची वाट बघत होते. तर मागील १५ दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात बदल झाले असून लातूर उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ हजार ७०० रुपायांनीं सोयाबीनची खरेदी होत आहे.
दरात अधिक वाढ होण्याचे कारण काय ?
यंदा भारताबरोबर इतर देशातदेखील सोयाबीनचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. तर दुसरीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे सोयाबीन निर्यातीवर निर्बंध आले आहेत.
तर चीनमध्ये सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे दरात वाढ होतांना दिसून येत आहे. तर बाजारसमितीमध्ये सोयाबीनला हंगामातील उच्चांकी दर मिळत आहे.
हे ही वाचा (Read This ) या फळाची लागवड करून मिळवा वर्षाला २५ लाख हमखास
आता सोयाबीन व्यतिरिक्त पर्याय नाही
भारतामध्ये युक्रेन बरोबर अर्जेंटिना येथून सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. मात्र युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात ठप्प झाली आहे. त्यामुळे उद्योजकांना आता सोयाबीन व्यतिरिक्त काही पर्याय नसल्याने देशांतर्गत बाजारामधील तेलासाठी सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली आहे.
हे ही वाचा (Read This ) भरघोस उत्पन्नासाठी पपई लागवड करण्याची हीच योग्य वेळ – कृषी तज्ज्ञांचा सल्ला
सोयाबीन उत्पादक शेतकरीच अच्छे दिन
खरीप हंगामात सोयाबीनचे अतिवृष्टी, अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर सोयाबीनला कवडीमोलाचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या साठवणुकीवर जास्त भर दिला होता. हंगामाच्या अंतिम टप्यात का होईना सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. या संयमाचे फळ आता शेतकऱ्यांना मिळतांना दिसत आहे.