इतर बातम्याबाजार भाव

सोयाबीन दराला उतरती कळा? १५० रुपयांची घसरण

Shares

सोयाबीनचे दर हे मागील २ दिवसांमध्ये केवळ २ दिवसासाठी स्थिर झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र आता सोयाबीनच्या दरामध्ये १०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

सोयाबीनच्या दरामध्ये सततच्या चढ उतारीनंतर स्थिरता आली होती. २ दिवसांसाठी सोयाबीनचे दर हे ७ हजार ३५० ते ७ हजार ४०० स्थिरावले होते. आता मात्र पुन्हा दरामध्ये चढ उतार सुरु झाली आहे. तर दुसरीकडे तुरीच्या दरामध्ये आता वाढ झाली असून आता बाजारभाव आणि हमीभाव हा सारखाच झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता खुल्या बाजारामध्ये तुरीची विक्री करत आहेत.

सोयाबीनचे आजचे दर

soybean bhav

सोयाबीनच्या दरात वाढ होताच आवक दुप्पट…

सुरुवातीला सोयाबीनला ५ हजार रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. तर टप्याटप्याने सोयाबीनची आवक सुरु होती. मात्र सोयाबीनच्या दरात वाढ होताच आवक दुपटीने सुरु झाली होती.

सोयाबीनच्या दरामध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी अचानक ४०० रुपयांची वाढ झाली होती. तेव्हा अचानकपणे दर वाढल्यामुळे १५ ते १८ हजार पोत्यांची आवक ही थेट ३० हजार पोत्यांवर पोहचली होती.

हे ही वाचा ( Read This) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

सोयाबीनच्या दरात १५० रुपयांची घसरण

मात्र त्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये ५० रुपयांची आणि आता १०० म्हणजेच १५० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता शेतकरी सोयाबीन साठवणूक करतात की विक्री हे पाहावे लागणार आहे. तर आता सोमवारी सोयाबीनचे दर काय असतील याकडे शेतकरी लक्ष ठेवू आहेत.

सोयाबीनला सध्या मिळत असलेले दर हे विक्रीसाठी चांगले आहेत. मात्र यंदा सोयाबीन उत्पादन कमी आले असून नैसर्गिक संकटांमुळे अधिक खर्च झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन दराकडून अधिक अपेक्षा आहेत. तरीही शेतकऱ्यांनी कोणताही निर्णय हा विचारपुर्वक सर्व अभ्यास करून घ्यावा असे व्यापारी अग्रवाल यांचे म्हणणे आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *