शेतकऱ्यांना कांदा का रडवतोय? दरात मोठी घसरण

Shares

मागील काही दिवसांपासून सगळीकडे सोयाबीनच्या दराची चर्चा सुरु होती. आता मात्र यामध्ये कांदयाची भर पडली आहे. याचे कारण म्हणजे कांदयाच्या दरामध्ये सातत्याने होत असलेली घसरण.

मागील महिन्यात कांद्याच्या दरात स्थिरता होती मात्र गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी या सर्व गोष्टींचा लक्ष देऊन अभ्यास केल्यानंतर असे कळले की कांद्याचे दर हे रात्रीतून बदलतात.

हे ही वाचा ( Read This) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

या ८ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात ७६४ रुपयांची तर उन्हाळी लाल कांद्याच्या दरात ६३० रुपयांची घसरण झाली आहे. कांदाच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादकांना ११ कोटी ७२ लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा ( Read This) सोयाबीन दराला उतरती कळा? १५० रुपयांची घसरण

कांद्याचे आजचे दर

kanda bhav

लाल कांद्याची आवक कमी जास्त प्रमाणात होत असल्यामुळे देशांतर्गत कांद्याचा पुरवठा अधिक प्रमाणात होत आहे . तर गेली महिन्यात कांद्याला कमाल २६२५ रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळत होता . मात्र आता कांद्याला १८६१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असून प्रति क्विंटल मागे ७६४ रुपयांची घसरण झाली आहे.

उन्हाळी कांद्यास गेली महिन्यात कमाल १८०० रुपये प्रति क्विंटल दर होता तर आता १८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असून प्रति क्विंटल मागे ६३० रुपयांची घसरण झाली आहे.

कांदा निर्यातीबाबत धोरण ठरवणे आवश्यक…

मध्यंतरी कांद्यास चांगला भाव मिळत होत तयामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील लाल कांद्याची रात्रीतून काढणी, कापणी करून बाजारपेठेमध्ये विक्री सुरु केली होती. त्यानंतर लाल कांद्याची आवक सुरु असतांनाच उन्हाळी कांद्याचे बाजारामध्ये आगमन झाल्यामुळे सर्वकाही थोडे बिघडले आहे. त्यामुळे कांदा निर्यातीबाबत काही धोरण करण्याची मागणी शेतकरी संघटना करत आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *