सोयाबीनच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय ठरला फायद्याचा ?
खरीप हंगामात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सर्वकाही बाजारपेठेच्या दरावर अवलंबून होते. सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत असतानाचे चित्र आपल्याला बघायला मिळाले. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाली होती मात्र त्यानंतर पुन्हा सोयाबीनचे दर घसरले होते.आता सोयाबीनच्या अंतिम टप्यात असून साठवणुकीचा फायदा आता सोयाबीन शेतकऱ्यांना होतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात स्थिरता होती मात्र आता दरात वाढ होतांना दिसून येत आहे.
ही वाचा (Read This ) कांद्याची आवक वाढूनही दर चढेच, यंदा मिळत आहे जास्त भाव
सोयाबीनला लागलेले ग्रहण आता सुटले
सुरवातीला सोयाबीनला चांगला दर नव्हता त्यानंतर दरात वाढ झाली होती. मात्र ती काही दिवसांपूर्ती त्यांनतर दर घासले असून त्या दरात स्थिरता होती. तर मागील ६ दिवसांपासून सोयाबीनला ६ हजार ४०० असा दर होता. मात्र आता या दरात वाढ झाली असून हा दर ६ हजार ५५० झाला आहे.तर कापसाच्या दरात देखील विक्रमी वाढ झाली आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला ११ हजार रुपये दर मिळाला आहे.
ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज
साठवणूक केलेल्या सोयाबीनची आवक सुरु
सध्या समाधानकारक दर असल्याने आता साठवणूकीतले सोयाबीन विक्रीवर शेतकरी भर देत आहे. त्यामुळेच लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 16 हजार पोत्यांची आवक झाली होती. असेच दर राहिले तर आवक वाढेल असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता साठवणूक करून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा अधिक प्रमाणात फायदा होत आहे.
ही वाचा (Read This ) या राज्यात लाल मिरचीचा ठसका, भाव २५ हजार पार