सोयाबीनच्या दराचा आलेख उंचावला, पुन्हा १० हजारचा पल्ला गाठणार?
युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा भडका आता आपल्या कडील बाजारपेठेत बघायला मिळत असून सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी आली आहे.पालखेड उपबाजार समितीत सोयाबीनला ७ हजार ७५० रूपये एवढा उच्चांकी दर आज मिळाला. आकर्षक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी साठविलेले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊन आवक वाढण्याची शक्यता आहे.
सोयाबीनच्या दरात आता कमालीची वाढ झाली आहे. सोयाबीन थेट ७ हजार ७५० वर पोचले आहे. तर भविष्यात दरात अजून वाढ होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेतकरी सोयाबीनची विक्री करतील कि साठवणूक हे बघण्यासारखे असले तरी बाजारात आता सोयाबीनची आवक वाढल्याचे चित्र दिसत आहे.
१५ दिवसात बदलला सोयाबीनच्या दराचा आलेख
सुरुवातीला सोयाबीनचा उचांकी दर होता मात्र त्यांनतर दरात घट होऊन हे दर ६ हजारावर स्थिर झाले होते. आता मात्र पुन्हा दरात वाढ होतांना दिसत आहे. मध्यंतरी सोयाबीनच्या दराने १० हजाराचा पल्ला गाठला होता. तोच भाव पुन्हा मिळेल की काय असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.
उन्हाळी सोयाबीन ची लागवड …
सध्या उत्पादनापेक्षा शेतमालाला किती दर आहे हे जास्त महत्वाचे आहे. कारण यावर शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. सुमारे पाचशे एकरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. दरात तेजी राहिल्यास उन्हाळी सोयाबीन शेतकऱ्यांना आधार देऊ शकते.
आगामी खरीप हंगामात सोयाबीनचा तुटवडा भासू नये, यासाठी बियाणे केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात सोयाबीन पेरण्याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.अनेक शेतकऱ्यांनी बियाणे केंद्रात नोंदणी करून सोयाबीनची पेरणी केली असून सोयाबीनची पेरणी योग्य बियाण्यापासून केली आहे की नाही हे महत्त्वाचे आहे.