सरकारचा सोयाबीन आयातीचा कोणताही निर्णय नाही? सोयाबीनचे दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी घसरण.
अजूनही सोया पेंड निर्यातीचा सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांबरोबर व्यापारीदेखील सोयाबीन दर वाढ होईल या आशेवर होता. परंतु काही दिवसांपासून सोयाबीन चे दर स्थिर होते मात्र आता त्यात घट होतांना दिसत आहे.
सोयाबीनची मागणी किती आहे आणि उत्पादन किती होत आहे याचबरोबर उन्हाळी हंगामात सोयाबीनचे वाढलेले क्षेत्र हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. केंद्र सरकारचा निर्णय लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. कारण त्यावर सोयाबीनचे भविष्य अवलंबून आहे. काही दिवसांपासून सोयाबीन च्या दरात सतत चड-उतार होत होता त्यानंतर ७ हजारावर येऊन थांबला तो अजूनही काही ठिकाणी स्थिर आहे तर काही ठिकाणी कमी होत आहे. त्यामुळे सोयाबीन दरात वाढ न होण्याची शक्यता दिसून येत आहे. अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठवणुकीवर जास्त भर दिला होता. त्यातल्यात्यात सोयाबीन पेंडची निर्यात थांबली आहे त्यामुळे मागणीतही घट झाली आहे. बाजारामध्ये आवश्यकतेचा अंदाज घेऊन सोयाबीनचा पुरवठा केला जात आहे. याचा दरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. स्थानिक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे आवक वाढत आहे. मात्र दरात घसरण होतांना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस काढला आहे तर काही शेतकरी टप्याटप्याने विक्रीस काढत आहे.
शेतकरी आता दर वाढीची वाट न पाहता टप्याटप्याने सोयाबीन विक्रीसाठी काढत आहे.आतापर्यंत दर वाढीचा परिणाम सोयाबीनच्या आयात – निर्यात वर होत नव्हता. परंतु आता सोयाबीनचे घसरते दर पाहता त्याची आवक वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना आता सोयाबीनचे भाव वाढणार नाहीत याची कल्पना आली आहे. त्यामुळे त्यांची विक्री करण्याचा पर्याय फायद्याचा ठरेल. सरकारने जरी सोयाबीन पेंडच्या आयातीस मुदतवाढ देण्यास नकार दिला असला तरीही त्याचा वापर हा तेवढ्याच प्रमाणात होत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन पुरवठा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती वर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाची वाट न बघत बसता सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणे गरजेचे आहे, असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे.