सोयाबीन साठवणूक फायद्याची की तोट्याची ?
दिवाळीनंतर सातत्याने बाजार समितीमध्ये दर वाढ होत होती. परंतु आता आवक वाढत असून दरामध्ये घट होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती. गेल्या १५ दिवसांपासून बाजारपेठेतील दराची चढउतार पाहता शेतकरी काळजीत पडला असून केंद सरकार काय निर्णय घेणार याकडे डोळे लावून आहेत. शेतकरी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्रीसाठी काढत आहे.
आवक वाढण्याचे नेमके कारण काय ?
दिवाळीनंतर साधारणतः दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये सोयाबीनचे दर २ हजार रुपयांनी वाढले होते. सोयापेंडच्या आयातीची चर्चा , जागतिक बाजारपेठ याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. शेतीसाठी पैशांची गरज भासत असल्यामुळे साठवून ठेवलेला सोयाबीन आता शेतकऱ्यांनी टप्याटप्याने काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आवक वाढत आहे.
सोयाबीन साठवणूक फायद्याची की तोट्याची ?
सोयाबीनला अपेक्षित दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी सॊयाबीन साठवणूक केली होती. त्यानंतर दरात वाढ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपॆक्षा वाढत गेल्या असून सोयाबीनला ८ हजार प्रति क्विंटल भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन विक्रीस काढणार नाही असे त्यांनी सांगितले होते. परंतु सोयाबीनच्या भावात आता अधिक वाढ होणार नाही असे निदर्शनात आले आहे. त्यातच सोयाबीन पेंड आयातीबाबतचे निर्णय सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्याटप्याने सोयाबीन विक्रीस काढण्याचा निर्णय नुकसानकारक नसल्याचे सांगितले जात आहे.