सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा किडींचे व्यवस्थापन
शेतकरी बंधूंनी आपल्या सोयाबिन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून या किडींनीआर्थीक नुकसानीची पातळी गाठताच (५ ते१० टक्के प्रादुर्भाव ग्रस्त झाडे ) नियंत्रणाचे ऊपाय योजावेत.
सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा ही महत्वाची कीड आहे. या किडींचा मादी भुंगा पानाच्या देठावर,फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणत: एकमेकांपासून १ ते १.५ से.मी.अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल (चक) काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामूळे चककापाचा वरचा भाग सुकतो. अंडयातून निघालेली अळी पानाचे देट अणि फांदीतून आत जाते, मुख्या खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव हया किडीचा प्रादुर्भाव मुंग, उडीद,चवळी या पिकावर सुध्दा होवू शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या आवस्येत झाल्यास झाडाची पाने , फांदया व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारणत: दिड महिण्याचे झाल्यावर चक भुंज्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही, पण किड ग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनात घट येते. या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच चक्रकाप तयार केलेली पाने देठापासून काढून टाकावीत आणि त्यांचा . अंडी व अळयांसहीत नाश करावा.
या किडीचा व्यवस्थापनासाठी आवश्यकतेनुसार प्रोफेनाफॉस ५० टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोस्टूनिलीप्रोल १८५० टक्के ३ मिली किंवा इथियॉन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा थायक्लोप्रिड २१.७ टक्के प्रवाही १५ मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.ली.यापैकी, कोणतेही एक किटकनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.