इतर बातम्यायोजना शेतकऱ्यांसाठी

सौर कृषिपंप कुसुम योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

Shares

शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच त्यांना शेतीची कामे सोयीस्कर जावे यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. अशीच एक सौर कृषिपंप कुसुम योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आली असून यासाठी राज्यभरातून जवळजवळ १ लाख अर्ज प्राप्त झाले असून या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला १० टक्के ते ५ टक्के रक्कम अदा करावी लागणार आहे.
ज्या लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले असून जो पहिल्यांदा रक्कम अदा करेल त्यास प्रथम कृषिपंपाचे वाटप होणार आहे. सौर कृषिपंप कुसुम योजनेअंतर्गत दरवर्षी १ लाख कृषिपंप वाटपाचे उद्धिष्ट ठरवून दिले आहे.

वाचा (Read This ) पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२२, मिळणार ५० टक्के अनुदान

बनावट वेबसाइट पासून सावध राहा
अनेक जण पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान’ (प्रधानमंत्री कुसुम योजना) च्या नावाखाली काहीजण शेतकऱ्यांकडून सौरपंपासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अनेक बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून पडताळणी करूनच तुम्ही किंमत अदा करा. कारण काही बनावटी वेबसाइट org, in, com अश्या डोमेन च्या नावाने नोंदणीकृत आहे.

ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता
१. अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
२. स्वयं गुंतवणुकीद्वारे प्रकल्पसाठी कोणतेही आर्थिक पात्रता गरजेची नाही.
३. २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करू शकतो.
४. शेतकरी या योजनेअंतर्गत ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जासाठी अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. पासपोर्ट साईझ फोटो
३. रेशनकार्ड
४. मोबाईल क्रमांक
५. नोंदणी प्रत
६. बँक खाते पासबुक

या योजनेचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार असून CG पिकांना पाणी देण्यासाठी २४ तास वीज राहील तसेच वीजबिल वाचेल व आर्थिक लाभ होईल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *