आता, लवकरच मातीचे परीक्षण करा घरच्या घरी ?
उत्पादनात वाढ तसेच जमिन निरोगी रहावी यासाठी मातीचे परीक्षण करणे गरजेचे असते. मातीचे परीक्षण केल्यानंतर त्याच्या निष्कर्षावर कोणते पीक घ्यावे, कोणते पीक चांगले येईल , कोणत्या खतांचा वापर करावा हे समजते. परंतु माती परीक्षण करायचे म्हंटले तर साधारणतः १ किलो माती परीक्षणासाठी लॅब मध्ये पाठवावी लागते. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा रिपोर्ट येतो. यासाठी काही दिवस वाया जातात. आता मात्र तुम्ही दिवस वाया न घालवता अगदीच घरच्या घरी माती परीक्षण करू शकतात. कानपुर मधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने एक पोर्टेबल किट विकसित केलेली आहे. ज्यामुळे माती परीक्षण लवकर तसेच अचूक करता येईल. म्हणजे अगदीच ९० सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या शेतातील मातीचे आरोग्य कसे आहे हे जाणून घेता येईल. यासाठी तुम्हाला फक्त ५ ग्रॅम मातीची गरज पडेल.
कसे करावे माती परीक्षण ?
माती परीक्षणाचा निष्कर्ष तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच जाणून घेता येईल. यासाठी तुम्हाला ‘भू परीक्षक’ नावाचा अँप डाउनलोड करावा लागेल. ५ ग्रॅम माती ५ सेमी लांबीच्या परीक्षानळी सारख्या दिसणाऱ्या उपकरणामध्ये टाकावेत. त्यांनतर ब्लूटूथ द्वारे हे उपकरण मोबाईलला जोडावे. अगदीच ९० सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवर मातीच्या आरोग्याचा अहवाल आयडी क्रमांकासह लगेच उपलब्ध होईल.
माती परीक्षणाचे काय आहेत फायदे ?
ज्या जमिनीमध्ये आपण पीक घेणार आहोत त्या मातीमध्ये किती प्रमाणात आणि कोणत्या द्रव्यांची किंवा पोषक तत्वांची मात्रा किती आहे हे कळते.त्यानुसर कोणत्या खतांची उपाययोजना करावीत हे आपल्याला कळते.गैरवाजवी खाते देण्यावर नियंत्रण येते.शेतातील पिकांचे योग्य नियोजन करता येते. दोन पटीने अधिक आर्थिक लाभ होतो.पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी संपूर्ण माहिती मिळते.