सेंद्रिय कर्बचे मातितील प्रमाण
अगदी ढोबळमानाने विचार केल्यास मातीमध्ये २५% हवा , २५ % पाणी , ४५ % खनिजे आणि ५% सेंद्रिय कर्ब असल्यास अशी माती शेतीसाठी सर्वात चांगली मानता येईल. साधारणता सध्याच्या घडीला माती परीक्षांणानुसार १ % सेंद्रिय कर्ब असल्यास अत्यंत जास्त असा शेरा मिळतो. म्हणजेच ५ % सेंद्रिय कर्ब ही सध्या जवळपास कोणत्याच शेतकऱ्यांच्या आवाक्यातली गोष्टं दिसत नाही. कसा कुस्ती लढणार सेद्रिय शेतीचा पहेलवान ?
सेंद्रिय कर्बचे कार्य – एक महत्वाची बाब म्हणचे , पिके (झाडे) सेद्रिय कर्बचा उपयोग अनद्राव्य म्हणून करतच नाहीत. तर सेंद्रिय कर्ब हे मुख्यत्वे मातीतील जिवाणूंचे खाद्य आहे. म्हणजेच जीवाणू सेंद्रिय कर्ब खाऊन , मातीतील अनद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतात. उदारणार्थ शेण खतातील नत्र अमोनिया (NH3) ह्या स्वरुपात असून Nitrobactor कुळातील बाक्टेरिया त्याचे रुपांतर Nitrate किवा Nitrite (NO३ / NO२) मध्ये करून पिकांना पचनीय स्वरुपात आणून देतात. इतर सर्व अन्नद्रव्यच्या उपलब्धते साठी झाडे जमिनीतील सुक्ष्म-जीवनवरच अवलंबून असतात. सेंद्रिय कर्ब मातीचे भौतिक गुणधर्म जसे कि मातीची पाणी धारण क्षमता, भुसभुशीतपणा इ. सेंद्रिय कर्ब च्या उपलब्धते प्रमाणे बदलते. साधारणता असे मानले जाते कि २ ते ५ % पर्यंत सेंद्रिय कर्ब असणाऱ्या (जंगलातील चहाच्या पुडी सारखी माती ) १ चमचाभर मातीमध्ये पृथ्वीवरील लोकसंख्ये पेक्षा जास्त जीवाणू असू शकतात.
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणजे ‘महाराष्ट्र कृषी दिन’
सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे – सध्या आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी (०.१ ते १ %) असण्याचे मुख्य करण – व्यावहारिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर , जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण , पिक पलटणी न करणे , मातीची मशागत मोठ्या प्रमाणावर करणे आणि जमिनीला विश्रांती न देणे ही दिसतात. नैसर्गिक शेती मध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त आढळून येते. पण व्यवहारिक दृष्टिकोनातून बघताना जमिनीची मशागत न करणे हा पर्याय तरी आता शक्य दिसत नाही.
जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवून सेंद्रिय किंवा शाश्वत शेती कशी करता येईल – जमिनीमध्ये एखादी गोष्ट कुजण्यासाठी ज्या मुख्य गोष्टींची गरज असते त्यामध्ये जमिनीतील ओलावा (पाण्याचे योग्य प्रमाण) आणि नत्राचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीला नत्राचे प्रमाण हे मुख्यता काडी-कचरा (Soil Organic Matter) प्रकार , हवामान इ. वर अवलंबून असते. जसे कि झाडांच्या पानां पेक्षा प्राण्यांपासून तयार झालेला कचऱ्यात ( शेण,गोमुत्र , मासळी खत इ.) जास्त नत्र असते. म्हणूनच उसाच्या पाचटापेक्षा , शेण किवा कोंबड खताला जास्त जोर असतो.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपूर्वी कृषी शास्त्रज्ञांनी सांगितला हा सल्ला
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीतील ओलाव्या नुसार बदलणार असेल तर ह्याचा अर्थ असा की एखाद्या परिसरातील हवामानानुसार मातीमध्ये काडी-कचरा कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये होण्यासाठी कमी-जास्त वेळ लागू शकतो. सोबतच्या चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे , काडी-कचरा कुजून उपयुक्त सेंद्रिय कर्ब बनण्यासाठी १-५ वर्ष लागू शकतात आणि हा सेद्रिय कर्ब स्थिरावून जमीन पूर्णपणे कसदार होण्यासाठी २० वर्षापर्यंत वेळ लागेल. हि वेळ कामी करण्यासाठी काही उपाय आहेत
जसे कि काडी-कचरा जमिनीत कुजण्यास १ महिना लागत असला तरी गाईच्या पोटात तो एका दिवसात कुजतो आणि शेण मिळते ……हे शेण biogas मध्ये वापरल्यास मिळणारी slurry जास्त उपयुक्त होते , ह्या slurry चे गांडूळ खत केल्यास सेंद्रिय कर्ब लवकरात लवकर मिळवता येईल. पण एक दिवसात कोणत्याही तयारी शिवाय सेद्रिय शेती कडे वळणे म्हणजे नुकसान अटळ !
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: कांदा निर्यातीला परवाणगी, दरात होईल सुधारणा
कोकणात जिथे पावसाचे आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे तेथे एखादी गोष्ट कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये लवकर होईल ह्याविरुद्ध विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये मातीतील ओलावा कमी असल्यामुळे एखादी गोष्ट कुजण्यासाठी जास्त वेळ लागेल. मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी हवामानानुसार काही गोष्टींचा अभ्यास करून शेतीतील आंतरमशागती किंवा शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा कराव्या लागतील विद्राव्य खतांची वैशिष्ट्ये : पिकांना ठिबक सिंचनमधून व फवारणीद्वारा दिली जाणारी विद्राव्य खते कशी असावीत त्यांची वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
१ पाण्यात पूर्णतः विरघळणारी खते (विद्राव्य) – ही खते एक – दोन किंवा तीन (बहू) पोषक अन्द्राव्याचे असलेले असून ती पाण्यात टाकली असता ताबडतोब विरघळतात. हे बहुमुल्य अन्द्राव्याचे द्रावण सिंचनाच्या पाण्यासोबत देणाऱ्या क्रियेलाच फर्टीगेशन असे संबोधिले जाते.
२ विद्राव्य खतांचा वापर- ठराविक सिंचन पद्धतीतून (ठिबक अथवा सूक्ष्म तुषार) नगदी पिकाच्या उत्पादनासाठी शेतात व तसेच संरक्षित वातावरण निर्माण करता येईल अशा ग्रीन हाउस, शेड नेट मध्ये वाढविल्या जाणाऱ्या पिकांसाठी केला जातो. ही खते फुलशेती भाजीपाला, फळबाग, बागेतील / घरात येणाऱ्या कुंड्यातील सुशोभीत झाडांकारीता वापरता येतात.
३ ठिबक सिंचामध्ये : पिकांची मुळे ठराविक क्षेत्राममध्येच वाढतात. या करिता तेथील माती परीक्षण वरचेवर करणे आवश्यक आहे . त्या माध्यमात पिकांच्या वाडीबरोबरच पोषक द्रव्य्रांचे प्रमाण सतत घटक असल्या कारणाने त्यांचा ठिबक सिचनातून ठराविक प्रमाणात नेहमी खते योग्य राहील.
४ खतांचे प्रामाण : जास्त झाल्यास व पाण्याचा पुरवठा मर्यादित असल्यास खतांचा क्षारभार जमिनीत वाढेल व त्यामुळे झाडांतील अन्नरस उलट प्रवाही होऊन अति क्षारामुळे जमिनीत शोषला जाईल व झाडाची वाढ खुंटून ती मरू शकतात.
रेशीम शेती: शेतकऱ्यांना कमी वेळात भरपूर उत्पन्न, तुती लागवडीसह रेशीम किड्याचे पालन करा,वाचा संपूर्ण माहिती
५ विद्र्व्य खतांची तीव्रता : ठिबक सिंचनातून खते देतांना खतांचा क्षारभार (सोल्ठ इंडेक्स) किती आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. जर सर्वच खते अति क्षाराची दिली तर झाडांना ती खते शोषून घेण्याकरिता लागणारा दाब (Osmotic Pressure, Turgure pressure) पुरेसा नसेल तर झाडांना मुळाकडे आधिक उर्जा द्यावी लागेल आणि त्यामुळे फुलधारणा, होणेस विलंब होतो. साहजिकच त्यामुळे फळाच्या काढणीस विलंब होतो बहार अकाली पुढे जातो त्या खतांची तीव्रता (Concentration) अति प्रमाणात असल्यास झाडांची मर होण्यांची शक्यता आहे विद्राव्य खतांचा क्षारभार ४० ते ५० दरम्यान ठेवला तर ती सर्व पोषकद्रव्ये मुळाच्या केशतंतू विनासायास पिकांना पूर्णत: उपलब्ध होतात.
६ सामू – झाडांच्या मुळाच्या केशतंतू जवळील, जमिनीचा सामु ६ ते ७ असल्यास झाडे पोषकद्रव्ये आदिकाधिक शोषून घेऊ शकतात. आपल्याकडील जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे ७.५ ते ८ असल्याकारणाने फॉस्फरस, पोटॅश, मग्नेशियमच्या कमतरतेबरोबर लोह, मंगल (मॅग्नीज) जस्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर आढळते. तेव्हा ठिबक सिंचनातून देणारी खते ही आम्लयुक्त (अॅसिडीक) ज्यामुळे ठिबक सिंचनाच्या पाण्याचा सामू ५.५ ते ६ पर्यंत आणू शकतील, तसेच दिलेली खते केशतंतू जवळ पोहोचल्यानंतर तेथे देखील त्या खतामुळे आम्लधर्मी सामू तयार होईल अशी विद्राव्य खते आम्ल युक्त असल्यामुळे ताबडतोड लागू पडतात. शिवाय सिंचनाच्या लॅटरल, ड्रिपर, नोझल इत्यादीमध्ये क्षाराचा साका साठत नाही आणि स्वतंत्रपणे अॅसिड वॉश देण्याची गरज पडत नाही. आम्लधर्मीय खताची मात्रा ८५ ते ९० टक्के पूर्णत: लागू पडते. हे गुणधर्म असलेल्या खत कंपन्याचीच खते वापरावीत.
७ सुक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खते – सुक्ष्म पोषक द्रव्यापैकी लोह, मंगल (मँगनीज) व जास्त ही झाडास / पिकास जमिनीचा सामू ४.४ ते ५.५ असल्यास उपलब्ध होऊ शकतात. परंतु एवढा जमिनीचा सामू खाली आणणे धोकादायक असून त्या जमिनीत अॅल्युमिनियम व लोह, स्फुरदाची उपलब्धता झाडांना अजिबात होऊ देत नाही. व त्याचे स्थिरीकरण होईल अॅल्युमिनियमचे स्फुरदयुक्त क्षार पिकांना अपायकारक ठरतात. लोह, मंगल व जस्त शक्यतो चिलेटेड फॉर्म मध्ये देणे अत्यंत आवशक आहे. चिलेटेड म्हणजे पूर्णत: रासायनिक प्रक्रियेने लोह, मंगल व जस्तेचे मेंटॅलिकेशन सेंद्रिय पदार्थात करणे उदा: इथिलीन डाय अमीनटेट्रा अॅसीटेड (ई.डी.टी.ए) यामध्ये या मूलद्रव्यांचे अणु वेष्ठीलेले असतात. त्यामुळे त्यांची विद्राव्यता वाढते,
जेणेकरून ते फवारणी अथवा पाण्यापासून दिले असता झाडांना सहज सुलभरीत्या उपलब्ध होऊन कार्यरत होतात. ही सुक्ष्म द्रव्ये नत्र, स्फुरद, पालाशयुक्त मिश्रणामधुन दिली असता त्यांची उपलब्धता कमी होते. म्हणून हायसोल उत्पादीत मायक्रोसोल किंवा १९:१९:१९ सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त ग्रेड प्रति एकर शक्यतो फवारणीने (१२५ ते २५० ग्रेम २५० लिटर पाण्यात प्रति एकरी प्रति आठवडा) याप्रमाणे दिलेले सूक्ष्म द्रव्यांची कमतरता दिसून येत नाही.
कृषी क्षेत्रासाठी मोठी बातमी – लवकरच शेतकऱ्यांना मिळणार नॅनो डीएपी, तीन प्लांटमध्ये उत्पादन सुरु !
८- खताची विद्राव्यता – ठिबक सिंचानातून देणाऱ्या खतांची विद्राव्यता (Solubility) किती आहे हे पाहणे आवश्यक आहे. एक लिटर पाण्यात १५० ग्रॅम हायसोल एन.पी.के खत टाकल्यास ते पूर्णत: पाण्यात ५ ते ७ मिनिटात विरघळते तसेच हयसोल के (पोटेशियम सल्फेट) १०० ग्रॅम विरघळते. म्हणजेच त्याची विद्राव्यता अनुक्रमे १५ ते १० टक्के आहे. या तीव्रतेच्या खतांचा सामू २ ते ३.५ पर्यंत असल्या कारणाने द्रावण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सोडण्यापूर्वी १० पट (१०० लिटर) पाण्यामध्ये मिसळलेले असता त्याचा सामू ४ ते ५.५ पर्यंत होतो व ते द्रावण व्हेंचुरी अथवा एचटीपी वा डोझामेट्रिक तत्सम प्रकारच्या पंपाने (किंवा) फर्टीलायझर टँक वापरल्यास सिंचन पाण्याच्या दाबाने ठिबक सिंचन पद्धतीमध्ये देणे सोईस्कर होते व त्या सिंचन पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ पर्यंत होतो हे विशेष महत्वाचे आहे.
जर तुम्हाला शेतीमध्ये योग्य उत्पन्न मिळत नसेल तर 35% सबसिडीवर अन्न प्रक्रिया युनिट सुरु करा, येथे करा अर्ज
९ विद्रव्य खतांचे स्वरूप (फॉर्मुलेशन) – विद्राव्य खताच्या द्रावणातून उपलब्ध होणारी पोषकद्रव्ये पिकांना ताबडतोब शोषून घेता येईल अशा स्वरुपात असावीत. उदा. हायसोल मधील नत्र १० टक्के ते २५ टक्के नायट्रोजन फॉर्म मध्ये व ९० ते ७५ टक्के अमोनिकल व नंतर नायट्रेट स्वरुपात होण्यास ७ ते १२ दिवस लागतात तेव्हा अमाईड नत्र ऊस / कापूस व ऊस पिकांना घ्यावयास हरकत नाही. परंतु भाजीपाला, फळभाजी, फुल शेती व फळ बागांकरिता (बहराच्या वेळी) अमाईड खते देण्याचे टाळावे कारण ज्यादिवशी ते ठिबक सिंचनातून दिले जाते. त्याच दिवशी अथवा पुढील दोन ते तीन दिवसात लागू न पडल्याने पिकांची / झाडांची वाढीव पुढील पंधरा दिवसात बदलते व नको असतांना नत्रांचे प्रमाण जमिनीत व त्याचा विपरीत परिणाम होण्याचे टाळता येत नाही.
शेळीपालन करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना सुरू, तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता !
१० विद्राव्य खतांची तीव्रता – अति तीव्र (विद्राव्य खतांच्या) द्रावणामुळे त्या पोषकद्रव्यांचे इतर पोषकद्रव्याबरोबर व जमिनीत असणाऱ्या इतर घटकांबरोबर स्थिरीकरण होऊन खतांच्या ज्यादा दिलेल्या मात्रांचा दुष्परिणाम, शिवाय विनाकारण ज्यादा खर्च होतो. जमिनीच्या व जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील क्षार विशेष, क्लोराईड्स, नायट्रेट्रस, कार्बोनेट्स वाढविण्यास आपणच कारणीभूत होतो. हे समजून घेतले पाहिजे. म्हणूनच योग्य तीव्रतेचीच विद्राव्य खते घ्यावीत.
धन्यवाद
रुपेश बावणे
चंद्रपूर
आज पासून संपूर्ण देशात प्लास्टिक बंद, वापरल्यास व विक्री केल्यास भरावा लागेल लाखोंचा दंड