शेवगाचे भरगोस उत्पन्न मिळवून देणारे नवीन वाण
सर्वांची आवडती शेंगवर्गीय भाजी म्हणजे शेवगाच्या शेंगा. या पिकास बाजारात जास्त मागणी बरोबर भाव देखील जास्त आहे. शेवगाच्या शेंग्यांमध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. शेवगाच्या काही वाणापासून अधिक उत्पादन मिळवता येते. आपण अश्याच शेवगाच्या महत्वाच्या वाणांची माहिती जाणून घेणार आहोत.
शेवगाचे महत्वाचे वाण –
रोहित – १
१. या जातीचे लागवड केल्यानंतर अगदी ६ महिन्यातच उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते.
२. या जातीच्या शेंग्यांची लांबी ४५ ते ५५ सेमी असते.
३. या शेंगांचा आकार सरळ व गोल असतो.
४. या जातीचे इतर वाणापेक्षा ३०% जास्त उत्पादन मिळते.
५. या शेंग्यांचा रंग गडद हिरवा असून चवीस ह्या गोड असतात.
६. या जातीच्या ८०% शेंग्यांची निर्यात केली जाते.
७. या वाणाचे ११ वर्षाचे झाड जास्त उत्पादन देते.
८. या वाणापासून ७ ते ८ वर्षापर्यंत उत्पन्न मिळवता येते.
९. या शेंगाचे वार्षिक एका झाडापासून १५ ते २० किलो उत्पादन मिळते.
जाफना –
१. शेंगाची ही जात स्थानिक तसेच लोकल आहे.
२. या शेंगास देशी शेंगा म्हणून ओळखले जाते.
३. या शेंगा चविष्ट असतात.
४. या वाणाच्या शेंगा एका देठावर एकच येतात.
५. या वाणाच्या शेंग्यांची लांबी २० ते ३० सेमी पर्यंत असते.
६. फेब्रुवारी महिन्यात या वाणास फुले येण्यास सुरुवात होते.
७. शेंगा मार्च , एप्रिल , मे मध्ये परिपक्व होतात.
८. प्रत्येकी हंगामात एका झाडापासून १५० ते २०० शेंगा मिळतात.
९. या शेंग्यांचे बी आकाराने मोठे असते.
कोकण रुचिरा –
१. कोकण विद्यापीठाने हा वाण विकसित केला आहे.
२. पाच ते सोळा मीटर पर्यंत या झाडाची उंची असते.
३. या वाणाच्या एका झाडास १५ ते १७ फांद्या तसेच उपफांध्या येतात.
४. या वाणाच्या शेंग्यांचा रंग गडद हिरवा असतो.
५. या वाणास एकाच हंगामात शेंगा येतात.
पीकेएम -१
१. हा वाण तामिळनाडू कृषी विद्यापीठातील पेरियाकुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे.
२. लागवड केल्यांनतर साधारणतः ६ महिन्यांनी या शेंगा परिपक्व होतात.
३. या वाणाच्या शेंग्यांची लांबी ४० ते ४५ सेमी असते.
४. महाराष्ट्रातील वातावरणात वर्षातून दोनदा यास शेंगा येतात.
५. या शेंगा वजनदार असून अत्यंत चविष्ट असतात.
६. दोन्ही हंगाम मिळून ६५० ते ८५० पर्यंत शेंगा मिळतात.
पीकेएम- २
१. हा वाण तामिळनाडू विद्यापीठाने विकसित केला आहे.
२. या वाणाने शेवगा शेतीतील खरी मुख्य क्रांती केली आहे.
३. भारतामध्ये हा वाण विक्रमी उत्पादन देतो.
४. या वाणाची योग्य काळजी घेतल्यास प्रति झाड प्रमाणे ८०० ते १००० शेंगा मिळतात.
५. या वाणाच्या शेंगा अत्यंत चविष्ट , रुचकर असतात.
६. या शेंगा वजनदार असतात.
७. या वाणाची परदेशी मोठ्या संख्येने निर्यात केली जाते.
शेवगाच्या शेंगांस भाव जरी जास्त असला तरी वरील वाणांची लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते.