शेतकऱ्यांसाठी फायदेशीर किसान विकास पत्र योजना !
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक महत्वाची किसान विकास पत्र योजना भारत सरकारकडून राबवली जात आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास काही वर्षांनी पैसे दुप्पट होऊ शकतात. किसान विकास पत्र योजनेमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. बँकेबरोबरच पोस्ट ऑफिस देखील अनेक छोट्या छोट्या बचत योजना राबवत आहेत. किसान विकास पत्र या योजनेसाठी खाते उघडायचे असेल तर तुम्हाला नजीकच्या पोस्ट ऑफिस च्या शाखेत जाऊन उघडावे लागेल. या योजने अंतर्गत तुम्ही ज्या पैसांची गुंतवणूक कराल ते पैसे १२४ महिन्यांनी दुप्पट होतील. आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
किसान विकास पत्र योजना –
१. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक ६.९ % व्याजदर मिळतो.
२. या योजनेमध्ये कमी पैश्यांची देखील गुंतवणूक करता येते.
३. या योजनेसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म भरून खाते उघडून घ्यावे लागते.
४. तुमचे वय १० वर्षापेक्षा जास्त असल्यास तुम्ही खाते उघडू शकता.
५. तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही गुंतवू शकता.
किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून फायदा जरी होत असला तरीही गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.