शेळ्यांमधील खुडसरा आजारावर उपाययोजना
शेतकरी शेती बरोबरच एक जोडधंदा करत असतो. त्यात पशुपालन मोठ्या संख्येने जोडधंदा म्हणून केला जातो आणि पशुपालन मध्ये शेळी पालन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे . शेळीपालन अगदी कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते. मात्र शेळींची काळजी थोड्या बारकाईने घ्यावी लागते. त्यांचे खाद्य , निवारा , रोगांचे व्यवस्थापन या गोष्टींवर लक्ष दिले गेले पाहिजे . आज आपण शेळ्यांमध्ये दिसून येणाऱ्या खुडसरा आजाराबद्दल जाणून घेवू.
काय आहे खुडसरा आजार –
१. खुडसरा आजार हा जिवाणूंमुळे होतो.
२. हा जंतुसंसर्ग शेळीच्या पायातील खुरामध्ये असलेल्या जागेवर होतो.
३. खुडसरा आजारामध्ये सुरुवातीला सूज येऊन तो भाग सडण्यास सुरुवात होते.
४. परिणामी कालांतराने तो भाग निकामी होऊन जातो.
खुडसरा आजाराचे लक्षणे –
१. शेळ्या लंगडत चालतात.
२. ज्या पायाला सूज आली आहे तो पाय वरती धरून उभे राहतात.
३. या आजारात शेळ्यांचे वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होते.
खुडसरा अजारावरील उपाय –
१. शेळ्या जर पावसाळयात चरायला जात असतील तर त्यांच्या साठी फूटवॉश चा वापर करावा.
२. शेडच्या प्रवेश दारावर २% फॉर्मलीन द्रावण वापरावेत.
३. अश्या प्रकारचे लक्षणे दिसताच त्यांना बाहेर चरण्यासाठी पाठवू नये.
४. त्यांना पाणी आणि खाद्य जागेवर द्यावेत.
५. त्वरित पशुैद्यकाच्या सहायाने औषधे द्यावेत.
६. त्यांच्या खुराकाचे प्रमाण वाढवावेत.
प्रतिबंधात्मक उपाय –
१. शेळ्यांचे खुर वाढले असतील तर ते वेळोवळी कापावेत.
२. खुराच्या वरच्या बाजूचा केसांवर घाण जमा होत असते त्यामुळे येथील केस कापून काढावेत.
३. खूराच्या मध्ये सूज आली असेल तर त्यावर माश्या किंवा आळ्या बसू देऊ नयेत.
४. कोणतेही उपचार करण्यापूर्वी पशूवैदकाचा सल्ला घ्यावा.