शतावरीची लागवड करून मिळवा लाखोंचे उत्पन्न!
शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या व्यापारी दृष्टिकोनातून पिके घेत आहे.
महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जिरेनियम लागवड, ड्रॅगन फ्रुट इतकेच नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी आता सफरचंद सारख्या दुर्मिळ फळपिकांकडे देखील वळत आहेत. त्यातच औषधी वनस्पती हा पर्यायदेखील शेतकरी अवलंबताना दिसत आहेत. शतावरी सर्वांना माहितच असेल . शतावरी त्याच्या औषधी गुणांमुळे प्रसिद्ध आहे .
शतावरीचे औषधी महत्त्व –
१. शतावरी चवीस कडू व पचनास हलकी असते.
२. शतावरी वात व पित्तनाशक असून सर्व शरीर धातूंना बळ देणारी, बुद्धीचा तल्लख पणा वाढवणारी व डोळ्यांना हितकारक अशी आहे.
३. पित्तप्रकोप, अपचन आणि जुलाब यासाठी मधातून शतावरी दिली जाते.
४. शक्ती वाढविण्यासाठी शतावरी चूर्ण दुधात खडीसाखर मिसळून द्यावे.
५. मुतखड्यासाठी शतावरीचा रस सात दिवस सकाळच्या वेळी घ्यावा.
६. आंबट कडू डेकर, बेंबी भोवती पोट दुखणे या व्याधींवर गुणकारी आहे.
७ शरीरात वाढलेल्या पित्तामुळे छातीत दुखणे, घशाला जळजळ, तोंडास कोरड पडणे डोके दुखनेयावर उपयुक्त ठरते.
जमीन आणि हवामान –
१. या पिकाच्या लागवडीसाठी सर्व प्रकारची माती चालते.
२. पण वाळूमिश्रित पोयट्याची, लाल किंवा काळी जमीन अधिक चांगले असते.
३. मातीत पाण्याचा निचरा होत असेल तर फारच उत्तम असते.
४. जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण चांगले असावे व जमीन २० ते ३० सेंटिमीटर पर्यंत भुसभुशीत असावी.
५. जर या पिकासाठी लागणारे हवामानाचा विचार केला तर यासाठी उष्ण किंवा समशीतोष्ण वातावरण चांगले मानवते.
६. तसेच एक दुष्काळी भागात त्याचबरोबर थंड वातावरणात देखील येऊ शकते.
पूर्वमशागत –
१. या पिकासाठी लागवडीचे क्षेत्र ची निवड करताना जमीन व्यवस्थित भुसभुशीत करावी.
२. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून त्यामध्ये २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.
३. तसेच रोटाव्हेटरच्या साह्याने शेतात असलेले ढेकूळ फोडून घ्यावीत.
४. पाऊस पडल्यानंतर कुळवणी करून साठ सेंटीमीटर अंतराच्या सऱ्या पाडून घ्याव्यात.
शतावरीची लागवड –
१. तयार केलेल्या सरी-वरंबा पद्धतीचा लागवडीसाठी वापर करावा.
२. शतावरीची वंशवृद्धी साठी एक किलो बियाणे प्रति हेक्टर, गड्यांच्या फुटव्यापासून किंवा ओल्या मुळा पासून पण रोपेतयार केले जातात.
३. सऱ्या पाडतांना दोन सऱ्यामधील अंतर हे 60 सेंटिमीटर ठेवावे.
४. त्याचबरोबर सरीवर आंब्याची उंची जास्त चढवून घ्यावी.कारण शतावरीच्या मुळ्या एक ते दीड फुटापर्यंत खोल जातात.
५. त्याप्रमाणे ६० सेंटिमीटर पर्यंत वरंब्याची उंची करून घ्यावी कारण काढणीला त्रास होत नाही.
६. तसेच दोन रोपांमधील अंतर हे ६० ते ७५ सेंटिमीटर ठेवावे.
शतावरीची काढणी व उत्पादन –
१. लागवडीनंतर १८ ते २० महिन्यांनी काढणी करता येते.
२. शतावरीच्या झुबक्यांनी वाढलेल्या मुळे खणून काढाव्यात व वेलीची खोडी तशीच ठेवावीत.
३. काढलेली मुळे स्वच्छ करून लगेच मुळांवरील बारीक साल काढून १० ते १५ सेंटिमीटर लांबीचे तुकडे करावेत.
४. मुलांमधील शिर ओढून काढावी म्हणजे वाळण्याची प्रक्रिया लवकर होते.
५. पांढरी शतावरी च्या १० ते १२ टन प्रति हेक्टर मुळ्या मिळतात.
६. पिवळी शतावरी पासून ४ ते ६० टन प्रति हेक्टर मुळ्या मिळतात.
तर अश्या पद्धतीने आरोग्याला फायदेशीर असलेल्या शतावरीची आपण सोप्या पद्धतींनी लागवड करू शकतो.