इतर बातम्या

संक्रांत आली तोंडावर , तिळाच्या दरात झाली वाढ !

Shares

खरिप हंगामातील पिकांबरोबर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अवकाळी पडलेला पाऊस . या अवकाळी पडलेल्या पावसामुळे पिकांसोबत शेत मालाचे नुकसान तर झालेच त्याचबरोबर दरात देखील मोठी तफावत झाली. सोयाबीन, तूर, फळे यांच्या किमतीवर जास्त परिणाम झाला. आता याचा परिणाम सणांवर देखील होणार आहे असे चित्र दिसून येत आहे.
संक्रांति आता काही दिवसात येणार आहे आणि संक्रांतीमध्ये सर्वाधिक महत्व असणाऱ्या , त्याशिवाय संक्रांति अपुरी आहे अश्या तिळाचे दर वाढणार आहेत असे निदर्शनात यात आहे. याचे कारण असे की यावेळेस तीळ उत्पादनात १५ टक्क्याने घट झाली आहे. तसे पहिले तर इतर पिकांपेक्षा तिळाचे उत्पादन हे कमी प्रमाणातच निघत असते. भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिसा येथे तिळाचे उत्पादन घेतले जाते.

मागणी जास्त मात्र उत्पादन कमी
भारतात पावसामुळे तिळाचे उत्पादन कमी झाले असले तरी इतर देशात देखील तिळाच्या उत्पादनात घट होत आहे. देशात ५ लाख मेट्रिक टन उत्पादनाची अपेक्षा असते. मात्र यावेळेस २५ टक्क्याने यात घट होण्याची जास्त प्रमाणात शक्यता दिसून येत आहे. आयात निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचा दर देखील वाढला आहे. त्यात आफ्रिका मधून तिळाची आयात बंद झाली आहे. त्यामुळे जगातच मागणी जास्त मात्र पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पावसाचा तिळाच्या दर्जावर काही परिणाम झाला का ?
पावसामुळे जवळजवळ सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात तिळाचे तर नुकसान झालेच त्याच बरोबर तिळाच्या दर्जावरही परिणाम झालेला दिसून आला आहे. अवकाळी पावसामुळे चांगले तीळ कमी प्रमाणात तर डाग पडलेल्या तिळाचे जास्त प्रमाणात उत्पादन झाले आहे.

तिळाच्या दरात किती झाली वाढ ?
गेल्या ४ ते ५ महिन्यात तिळाच्या दरात ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यावेळेस तिळाचे उत्पन्न केवळ ३ लाख २५ हजार मेट्रिक टन होणार आहे, असा अंदाज दर्शवला जात आहे. जुलै महिन्यात ९५ ते १२५ रुपये किलो, ऑगस्ट महिन्यात १०० ते १३० रुपये प्रति किलो, सप्टेंबर महिन्यात ११० ते १४० रुपये, ऑक्टोबर महिन्यात १२५ ते १६० रुपये प्रति किलो, नोव्हेंबर महिन्यात १३० ते १६५ रुपये प्रति किलो तर डिसेंबर महिन्यात १३० ते १७० रुपये प्रति किलो अश्या प्रकारे तिळाचा दर होता.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *