संक्रांत तोंडावर, तिळाच्या दरात तेजी
भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिसा येथे तिळाचे उत्पादन घेतले जाते. आता संक्रांत सण तोंडावर आला आहे आणि संक्रांत म्हंटले तर लगेच तिळगुळ समोर येतात. इतर पिकांपेक्षा तिळाचे उत्पादन हे कमी प्रमाणातच निघत असते. यावेळेस बदलत्या वातावरणामुळे तिळाचे उत्पादन अधिक कमी झाले आहे असून याचा परिणाम आता सणावर होणार आहे असे चित्र दिसून येत आहे.
हे ही वाचा (Read This) तुरीच्या दरात वाढ, तूर हमीभाव केंद्रावर शुकशुकाट
मागणी जास्त मात्र पुरवठा कमी …
पावसामुळे जवळजवळ सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात तिळाचे तर नुकसान झालेच त्याच बरोबर तिळाच्या दर्जावरही परिणाम झालेला दिसून आला आहे. अवकाळी पावसामुळे चांगले तीळ कमी प्रमाणात तर डाग पडलेल्या तिळाचे जास्त प्रमाणात उत्पादन झाले आहे.देशात ५ लाख मेट्रिक टन उत्पादनाची अपेक्षा असते. मात्र यावेळेस २५ टक्क्याने यात घट होण्याची जास्त प्रमाणात शक्यता दिसून येत आहे. आयात निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचा दर देखील वाढला आहे. त्यात आफ्रिका मधून तिळाची आयात बंद झाली आहे. त्यामुळे जगातच मागणी जास्त मात्र पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तीळाचे दर …
जुलै २०२० मध्ये तीळाचे दर हे ९५ ते १२५ रुपये प्रति किलो या प्रमाणे होते. तर डिसेंबर महिन्यात १३० ते १६५ रुपये प्रति किलो या प्रमाणे होते. गेल्या ४ ते ५ महिन्यात तिळाच्या दरात ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यावेळेस तिळाचे उत्पन्न केवळ ३ लाख २५ हजार मेट्रिक टन होणार आहे, असा अंदाज दर्शवला जात आहे. जुलै महिन्यात ९५ ते १२५ रुपये किलो, ऑगस्ट महिन्यात १०० ते १३० रुपये प्रति किलो, सप्टेंबर महिन्यात ११० ते १४० रुपये, ऑक्टोबर महिन्यात १२५ ते १६० रुपये प्रति किलो, नोव्हेंबर महिन्यात १३० ते १६५ रुपये प्रति किलो तर डिसेंबर महिन्यात १३० ते १७० रुपये प्रति किलो अश्या प्रकारे तिळाचा दर होता. आता या दरात अजून थोडी वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.