शेतकऱ्यांनो सावधान…! दम्याचा धोका वाढू शकतो…
पिकांचे उत्पादनामध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खते आणि कीटकनाशके यांचा वापर केला जातो. या वापरल्या जाणाऱ्या रसायनांना अग्रोकेमिकल्स म्हणजेच कृषी रसायने म्हणतात. ज्यांच्या वापराने पिकांचे रोगांपासून रक्षण होते. पण या अग्रोकेमिकल्स चा प्रमाणापेक्षा जास्त वापर पर्यावरणाला घातक ठरतो आहे. अग्रोकेमिकल्स भोवतालच्या जमिनीत पोहोचतात, जलसंस्थांमध्ये आणि अन्नसाखळ्यांमध्ये प्रवेश करतात.
वाढत्या प्रमाणात या रसायनांचा वापर केल्याने निर्माण होणाऱ्या अवशेषांमुळे, जमिनीतील अन्नघटकांसाठी आवश्यक असणाऱ्या पोषणाच्या असंतुलनाचे प्रमाण वाढते. परिणामी कृषी उत्पादनांची गुणवत्ता ढासळू लागते. याचा घातक असा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. जसे अन्नधान्यामध्ये राहिलेल्या कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे मानवांमध्ये दम्याचा प्रचंड धोका उद्भवतो
पर्यावरणातील विविध घटकांवर यांचा परिणाम दिसतो.. बघुयात मर्यादेपेक्षा जास्त वापरलेले अग्रोकेमिकल्स कुठल्या घटकावर कसा परिणाम करतात.
मातीवर होणारे परिणाम:
• मातीच्या पीएच पातळीमध्ये बदल दिसू लागतो.
• अनेक विषारी chemical आपल्या अन्न साखळीत प्रवेश करतात आणि मातीचा कस कमी होऊ लागतो.
• मातीमध्ये असणाऱ्या आणि फायदेशीर ठरणाऱ्या जीवांना या रसायनाच्या वापराने फटका बसतो, त्यामुळे ते जीव अकार्यक्षम होतात, नष्ट होतात. यामुळे मातीला हानी होण्यास सुरुवात होते.
• फर्टिलायझर्स मधील नायट्रेट मुळे मातीतील नायट्रेटचे प्रमाण वाढू लागते.
पाण्यावर होणारे परिणाम:
• जलप्रदूषण वाढू लागते.
• अग्रोकेमिकल्स मिसळले गेलेले पाणी, वापरासाठी अयोग्य बनते .
• पाण्यातील केमिकल्स च्या वाढलेल्या प्रमाणामुळे पाण्यात शैवाल आणि इतर घातक घटक वाढू लागतात. याचा परिणाम जलजीवनावर होतो आणि त्यांचे जीवन धोक्यात येते.
• पाण्यात रासायनिक प्रक्रिया झाल्याने पाण्याचे गुणधर्म बदलू लागतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
हवेमध्ये होणारे परिणाम :
• अग्रोकेमिकल्स चा भयंकर परिणाम हा हवेमध्ये बघायला मिळतो.
• कीटकनाशके, बुरशीनाशके यांच्या केलेल्या फवारणीचे कण हवेमार्फत पसरू लागतात, पिण्याच्या पाणवठ्यांवर जाऊन पाणी दूषित करतात.
• हवेची रचना आणि शुद्धतेवर विपरीत परिणाम करतात.
• कीटकनाशकाचे कण हवेने विखुरतात, आणि हवेची रचना बदलतात.
• वारा प्रदूषित होतो आणि ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो.
• लहान बालके – वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यावर लवकर परिणाम दिसू लागतो.
• आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे श्वसनाच्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
अशाप्रकारे अग्रोकेमिकल्सच्या अति वापराने दम्याचा धोका वाढू शकतो.
मानवाच्या फुफ्फुसांवर थेट परिणाम करणाऱ्या ह्या अग्रोकेमिकल्सचा योग्य तेवढाच आणि जपून वापर झाला तरच आपले आरोग्य सुरक्षित राहू शकते.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क