इतर बातम्यापिकपाणीफलोत्पादन

पोत्यातील नवीन पीक पद्धत, मिळवा भरघोस उत्पन्न !

Shares

शेतकरी भाजीपाला, कडधान्य, फळ , फुले असे अनेक पिकांची लागवड करत असतो. अधिक उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतो. आपण आज अश्याच एका पद्धतीची माहिती जाणून घेणार आहोत. त्या पद्धतीच वापर करून आपण जास्त उत्पादन मिळवू शकतो तेही अगदी कमी खर्चात . चला तर जाणून घेऊयात या पद्धतीची संपूर्ण माहिती.

काय आणि कोणती आहे ही पद्धत ?
अधिक उत्पादन मिळवून देणाऱ्या या नवीन पद्धतीचे नाव आहे जवाहर मॉडेल . या पद्धतीमध्ये पिके जमिनीवर लावली जात नाहीत तर ती पोत्यात लावली जातात. जवाहर मॉडेल पद्धत जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. मध्य प्रदेशातील एका महिला शेतकरीने तूर पिकाची लागवड या पद्धतीचा अवलंब करून केली आहे. त्या शेतकऱ्याने सांगितले की जमिनीपेक्षा जास्त संख्येने शेंगा पोत्यामध्ये लावता आल्या आहेत. या शेतकरीने २०० पोत्यांमध्ये तूर पिकाची लागवड केली आहे. त्या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टरने नांगरणी करता येईल एवढीदेखील जमीन नसल्याने कृषी विद्यापीठातून या पद्धतीची संपूर्ण माहिती काढून त्याने याचा अवलंब केला आहे.

पोत्यात लागवड कशी करावी ?
पोत्यात लागवड करायची म्हंटले तर पोत्यात बियाणे टाकून लागवड करावी की रोपे लावून असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही दोन्ही पद्धतीने लागवड करू शकता. परंतु रोपवाटिकेत रोपे तयार करून त्यानंतर पोत्यात लागवड केल्यास झाडे चांगले वाढतात तसेच जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये मातीमध्ये शेण मिसळून पिकाची लागवड करतात. एका एकरमध्ये १५ ते २० किलो बियाण्याची पेरणी करता येते. प्रत्येक पोत्यात एक रोप लावून पोत्यांमधील अंतर सुरक्षित ठेवावेत. जेणेकरून रोपाला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळेल, असे डॉ. थॉमस यांनी सांगितले आहे.

किती दिवस ही पोते टिकतात ?
साधारणतः पोत्यात एकदा पीक लावले की ते पोते एक ते दीड वर्षे टिकतात. जर पोते फाटले किंवा एक दीड वर्षानंतर तुम्ही दुसऱ्या पोत्यात माती टाकून पीक पुन्हा लावू शकता.

कोणत्या पिकांची पोत्यात लागवड करता येते?
साधरणतः एका एकर मध्ये १२०० पोटे ठेवता येऊ शकतात. पोत्यामध्ये कोथंबिर, हळद लागवड करता येते. हळदीसारखे पिके सावलीत घेतले जाते तर एका पोत्यात ५० ग्रॅम हळदीच्या बियाण्याचा वापर केला जातो. पोत्यात कोथिंबीर लागवड केल्यास ५०० ग्रॅम पर्यंत कोथिंबीरीचे उत्पादन मिळवता येते. ६ महिन्यात २ ते २.५ किलो हळद मिळते.

खते कोणती वापरावीत ?
जर तुम्ही जमिनीत खत टाकले तर खते जमिनीत जातात. मात्र तुम्ही पोत्यात खते टाकल्यामुळे खते पोत्यातच राहतात त्यामुळे पिकास सर्व पोषक घटक मिळतात. पोत्यात पीक लागवड करतांना मातीबरोबर शेण मिसळून पोत्यात टाकले जाते . त्यामुळे इतर कोणत्याही खताची गरज पडत नाही.

कमी जागेत अधिक उत्पादन मिळ्वण्यासाठी जवाहरलाल मॉडेल पद्धतीचा वापर करून जास्त लाभ मिळवता येईल.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *