अबब ! या एका बैलासाठी मोजले २५ लाख रुपये
ग्रामीण भागातील सर्वात जिव्हाळाच्या विषयांपैकी एक म्हणजे बैलगाडा शर्यत. अनेक वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा बैलगाडा शर्यत होण्यास सुरुवात झाली असून सगळीकडे आता धुरळा उडतांना दिसत आहे.त्यामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा आता सुखावला आहे. ओतूरजवळील डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी प्रमोद उर्फ सोन्या दत्तात्रय डुंबरे यांच्या बजरंग बैलाची तब्बल २५ लाखाला विक्री झाली आहे. अणे माळशेज मार्गावरील दांगट वाडीचे उद्योजक किशोर दांगट व बंधू बबन दांगट या दोघांनी मिळून एका बजरंग या बैलाची खरेदी केली असून त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये मोजले आहेत.
ही वाचा (Read This ) शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान
गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीस बंदी होती. आता सशर्त बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बैलांच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. नानोली येथे बैलगाडा शर्यत राबवण्यात आली होती. या शर्यतीमध्ये एका बजरंगाने आपली कमाल दाखवून पहिला क्रमांक मिळवला आणि त्याचबरोबर रसिकांच्या मनात विशेष छाप सोडली. या कमालीच्या बैलाची विक्री डुंबरे यांनी तब्बल २५ लाखांमध्ये केली. पुण्यातील उत्तर भागातील एवढ्या जास्त किमतीमध्ये विक्री झालेले हे सर्वात पहिले उदाहरण आहे.
ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज
बैलगाडा शर्यत सुरु झाल्यापासून बैलाची किमान किंमत ११ लाख तर कमाल किंमत १५ लाख अशी आहे. आता बजरंग बैलास २५ लाख रुपये किंमत मिळाली असून संपूर्ण गाडाप्रेमींना या किमतीने आश्चर्य चकित झाले आहेत.
हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये