कांद्याच्या दरात वाढ,काय आहे कांद्याचे सध्याचे दर ?
बाजारात कांद्याची आवक होत असली तरी बहुतांश कांदा हा पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे दर्जात्मक कांदा बाजारात देखल होईपर्यंत कांद्याचे दर चढे राहतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र अवकाळी पडलेल्या पावसामुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
हे ही वाचा (Read This ) हळदीची आवक सुरु होताच मिळाला विक्रमी दर
नवीन कांद्याच्या ऐन हंगामात पाऊस पडला होता त्यामुळे कांद्याला गरजेपेक्षा जास्त पाणी पुरवठा झाला असून ओलसर कांदा बाजारात विक्रीस आला आहे. हा ओलसर कांदा फक्त एकच दिवस टिकू शकेल असा आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्यास जास्त प्रमाणात मागणी होत आहे असून कांदा निर्यात सुरु जाहली आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपिकाचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे निर्यातीमधून दिलासाही मिळत आहे.
हे ही वाचा (Read This ) या शेतीबरोबर उद्योगाची उत्तम संधी, विक्रमी दराबरोबर अनुदानाचा लाभ
सध्या कांद्याचा दर हे १६०० ते ३५०० रुपये क्विंटल असे आहे.