सोयाबीन उत्पादकांना दिलासा देणारी बातमी, दरात वाढ
मागील दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर हे स्थिर असून अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक केलेली होती. आता सोयाबीन शेवटच्या टप्यात असल्यामुळे कवडीमोलात अगदी मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करावी लागणार असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेवल्यामुळे आता त्यांना फायदा होणार आहे. कारण सोयाबीनच्या दरात थोडी वाढ झाली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव घोषित केला असून मागील दीड महिन्यातील हा सर्वात उच्चांकी दर असल्याचे सागितले आहे. आता साठवणूक केलेला सोयाबीन ( Soybean) बाजारात ( Market) लवकर दिसत आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा (Read This ) सोयाबीन पिकाला पर्यायी पीक ? ८० दिवसात मिळणार उत्पन्न
शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही दर वाढण्याची अपेक्षा कायम
सुरुवातीला सोयाबीनचे भाव (Soybean Rate) अतिशय कमी होते मात्र मध्यंतरी सोयाबीनच्या भावात सतत चढ उतार होत होती.मात्र दीड महिन्यापासून सोयाबीनचे भाव हे स्थिर असून आता भावात वाढ झाली आहे. सोयाबीनचे दर हे ६ हजारावर स्थिर होते आता यामध्ये ३०० रुपायांनीं वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु या भावात अधिक वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापासून सोयाबीनचे भाव वाढावेत यासाठी त्याची साठवणूक करून ठेवली होती. आता मात्र सोयाबीन काही प्रमाणात का होईना बाजारात दिसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा (Read This )ड्रोनने शेत फवारणीसाठी मिळणार १० लाखापर्यंत अनुदान
लवकरच उन्हाळी सोयाबीनचे आगमन
खरीप हंगामात सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केल्यामुळे सोयाबीन टप्याटप्याने बाजारात विक्रीस दिसत आहे. तर एकीकडे उन्हाळी सोयाबीन जोमात बहरत असतांना दिसत असून लवकरच त्याचे आगमन बाजारात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी थोडा काळजीत पडला आहे. तर अनेक शेतकरी सध्या आहे त्या भावात सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करत आहेत तर अनेक शेतकरी अधिक भाव वाढ होईल अशी अपेक्षा करत आहेत.