बाजार भाव

कांद्याची आवक वाढूनही दर स्थिरावले

Shares

महत्वाचे नगदी पीक म्हणून घेतले जाणाऱ्या कांद्याच्या (onion) दरात सतत चढ उतार होतांना दिसत आहे. यंदा सरासरीपेक्षा कांद्याची आवक जास्त झाली असली तरी त्याचे दर मात्र स्थिरच आहेत. आता साठवणूक केलेल्या तसेच खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरु होती. कांद्याच्या दरात (Onion Rate) रात्रीतूनच मोठी घसरण झाली आहे. दररोजच्या जेवणात तसेच हॉटेल मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा वापर केला जातो. त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे मात्र दर स्थिर आहेत त्यामुळे शेतकरी (Farmer) समाधान व्यक्त करत आहे.

ही वाचा (Read This हापूस आंब्याची बाजारात जोरदार एन्ट्री, ८ हजार १०० रुपये डझन

गावरान कांद्याला जास्त मागणी
गावरान कांद्याचे लागवड क्षेत्र हे कमी प्रमाणात असले तरी त्यास मागणी जास्त आहे. पुण्यामध्ये महात्मा फुले बाजारात ४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून प्रति क्विंटल प्रमाणे १ हजार ५०० ते २ हजार ८०० असा दर मिळत आहे. यंदा निसर्गाच्या लहरींमुळे उत्पादनावर परिणाम झाला असला तरी कांद्याची आवक चांगली होत आहे. त्यात गावरान कांद्याची जास्त प्रमाणात मागणी होत आहे.

ही वाचा (Read This ) इसबगोल : रब्बीत भरगोस उत्पन्न मिळवून देणारे पीक !

निर्यात केल्यास मिळणार अधिकचा दर …
पुण्यामध्ये मागिल काही दिवसांपासून गावरान कांद्याची आवक सुरु असून त्यास कमाल दर २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे. या कांद्याची निर्यात सुरु केली तर दरात वाढ होईल अशी अपॆक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरु होती आता गावरान कांद्याची आवक वाढली असून गावरान कांद्यास जास्त पसंती दिली जात आहे.
कांद्यास २ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कांद्याची आवक होत आहे.

ही वाचा (Read This ) पशुपालन करणाऱ्यांना सरकार यासाठी देणार ७५ टक्के अनुदान

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *