प्रधान मंत्री मोफत सोलार पॅनल योजना २०२२, योजनेसाठी असा करा अर्ज
शेतकऱ्यांना शेतीचे कामे सहज करता यावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असतात. अशीच एक डिझेल सिंचन पंपांऐवजी सौर पॅनेल वापरण्यात यावी यासाठी ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत केंद्र सरकारने प्रधान मंत्री सोलार पॅनेल योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ
या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या नापीक जमिनीवर सोलर पॅनल बसवून सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करू शकतो.
शेतकरी सौर पॅनेलद्वारे तयार केलेली ऊर्जा विकू शकतो.
सौर पॅनेलद्वारे तयार केलेल्या ऊर्जेचा वापर शेतातील पंप चालवण्यासाठी देखील करू शकतो.
शेतकऱ्यांना हा पंप बसवून पेट्रोलचा खर्च करावा लागणार नाही. तर सरकारकडून दरमहा अर्जदाराला ६००० रुपयांहून अधिक रक्कम खात्यामध्ये जमा केली जाईल.
या योजनेतून मिळालेली वीज तुम्ही सरकारी किंवा गैर-सरकारी कंपनीला विकू शकता.
१ वर्षात १ मेगा वॅटचा प्लांट ११ लाख युनिट ऊर्जा देईल, तर तुमची तयार झालेली ऊर्जा कंपनी ३० पैशांनी युनिट खरेदी करेल.
या योजनेची सुरुवात जमिनीवर १०,००० मेगावॅटची आणखी संयंत्रे उभारून आणि १.७५ दशलक्ष ऑफ ग्रिड कृषी सौर पंप उपलब्ध करून दिली जाईल.
पात्रता
- अर्जदार भारताचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराकडे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साइझ फोटो
- रेशन कार्ड
- मोबाइल नंबर
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- जमिनीचे कागदपत्रे
अर्ज कसा करावा ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला MNRE च्या अधिकृत वेबसाइटवर जाणून अर्ज करावा लागेल.
अधिकृत संकेतस्थळ
संपर्क क्रमांक
011-2436-0404
011-2436-0707