जाणून घेऊयात लाखो रुपये कमवून देणाऱ्या कोंबडीच्या नव्या संकरीत जातीविषयी
शेतीबरोबरच कुक्कुटपालन मोठ्या संख्येने केले जाते. कमी जागेत आणि कमी खर्चात हे काम होते आणि कुक्कुटपालन केल्यास त्यात नफा देखील जास्त होतो.
कुक्कुटपालन कमी जागेत ही मोठ्या संख्येने करता येतो.
भारतात ३८% जाती स्वदेशी आहेत.स्वदेशी कोंबड्यांची अंडे देण्याची क्षमता खूप कमी असते.महरणाप्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर यांनी एक नवीन, बहुरंगी संकरीत जात विकसित केली आहे. या जातीला महाराणा प्रताप यांच्या नावावरून प्रतापधन असे नाव देण्यात आले.
प्रतापधन कोंबडीच्या विशेषता –
१. ही जात बहुरंगी असते
२. या कोंबड्या ग्रामीण तसेच शहरी दोन्ही भागात सहजरीत्या पाळल्या जाऊ शकतात.
३. यांचा रंग हलका तपकिरी असा असतो.
४. या जातीच्या कोंबड्या झपाट्याने वाढतात.
५. यांचे वजन देशी कोंबड्या पेक्षा ७५% ने जास्त असते.
६. यांचे वजन ३ किलो पर्यंत असते.
७. या कोंबड्या देशी कोंबड्या पेक्षा ४ पटीने जास्त अंडे देतात.
८. या जातीच्या कोंबड्या १६० ते १७० अंडी दर वर्षाला देतात.
९. या जातीच्या कोंबड्यांचे पाय लांब असल्यामुळे त्या स्वतःचे रक्षण करू शकतात.
१०. या जातीच्या कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते त्यामुळे या कमी आजारी पडतात.