योजना शेतकऱ्यांसाठी

प्रधानमंत्री वय वंदन योजना, महिन्याला मिळेल ९ हजार २५० रुपये

Shares

प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत तुम्ही प्रति महिना प्रमाणे ९ हजार २५० रुपये पेंशन मिळवू शकता. ही योजना भारताचा जीवन विमा महामंडळ राबवत असून योजनेअंतर्गत एकरकमी गुंतवणूक केल्यावर मासिक पेन्शन उपलब्ध होणार आहे. शिवाय मासिक, त्रैमासिक आणि सहामाही योजना पेन्शनचीही तरतूद आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांबरोबर शेतकरी देखील घेऊ शकतात.

हे ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज

योजनेचे लाभ

१. प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत तुम्हाला जास्तीतजास्त महिन्याला ९ हजार २५० रुपये पर्यंत पेंशन मिळू शकते.
२. या योजनेचा कालावधी १० वर्षापर्यंतचा आहे.
३. तुम्ही योजनेमध्ये कमल ५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.
४. या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम तुम्हाला १० वर्षांनी परत मिळते.
५. तुम्ही ३ वर्षाच्या गुंतवणुकीनंतर कर्ज घेऊ शकता.
६. तुम्ही जास्तीतजास्त ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता.

वाचा (Read This ) पीएम किसान ट्रॅक्टर योजना २०२२, मिळणार ५० टक्के अनुदान

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. पॅन कार्ड
३. रहिवासी प्रमाणपत्र
४. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
५. बँक खाते पासबुक

ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज

अर्ज कसा करावा ?
१. तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी शाखेत (LIC Branch) जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.
२. तुम्ही खाली दिलेल्या टोल फ्री (Toll Free) नंबर वर संपर्क करू शकता.
१८००२२७७१७
०२२६७८१९१२९०

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *