प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना
मल्चिंग पेपर चे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे आपल्याला उपलब्ध पाण्यात नियोजन करावे लागते. मल्चिंग पेपर असेल तर पाण्याचे बाष्पीभवन पूर्णतः थांबते व पाण्याची बचत होते. त्यामुळे बाष्पीभवनामुळे जमिनीच्या वरच्या भागात होणारे क्षारांचे संचयन थांबते. मल्चिंग पेपरमुळे तण वाढू शकत नाही कारण पेपरमुळे तळापर्यंत सूर्य प्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे तणांची वाढ होत नाही व त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. तापमान नियंत्रित ठेवता येते.योजना प्लास्टिक मल्चिंग फिल्म साठी असून या मल्चिंग पेपर च्या साह्याने आपण उत्पादन बऱ्याच प्रमाणात वाढू शकतो. आपण जर पाहिले तर शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर हा भाजीपाला पिकांसाठी जास्त प्रमाणात करताना दिसतो. काय आहे प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना –प्लास्टिक मल्चिंग पेपरचा हेक्टरी खर्च हा बत्तीस हजार असून त्यावर ५० टक्के अनुदान मिळते. यानुसार जास्तीत जास्त हेक्टरी १६ हजार रुपये अनुदान मिळू शकते. डोंगराळ भागांमध्ये प्रतिहेक्टर अनुदानाचे प्रमाण हे ३६ हजार आठशे रुपये इतक्या मापदंडानुसार असेल. या खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच १८ हजार चारशे रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन एकर साठी हे अनुदान डोंगराळ भागासाठी देय राहणार आहे.
पात्र कोण कोण असेल –
१. बचत गट
२. शेतकरी
३. उत्पादक कंपनी
४. शेतकरी समूह
५. सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतात.
कोणते कागतपत्रे लागतात –
१. लाभार्थ्यांची आधार कार्ड ची झेरॉक्स कॉपी
२. आधार लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुक झेरॉक्स
३. लाभार्थ्यांना जमिनीचा सातबारा उतारा
४. 8- प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.
या योजनेबद्दल अधिक माहिती साठी संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.