फळबागेसाठी जमिनीची उपयुक्तता जाणून घेणे आहे गरजेचे
फळबाग लागवड करण्यापूर्वी जमिनीची उपयुक्तता जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते. फळानुसार जमिनीची निवड करणे गरजेचे आहे. अन्यथा उत्पादन चांगले येत नाही तर पिकांची वाढ खुंटते. आज आपण विविध फळांसाठी लागणाऱ्या जमिनीची माहिती जाणून घेणार आहोत.
फळबागेचे प्रकार व त्यासाठी लागणारी जमीन –
चिकू-
१. चिकू पिकाची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येते.
२. चिकू पिकासाठी उत्तम निचरा करणारी , खोल जमीन चांगली ठरते.
३. य पिकाच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा.
४. चिकू पिकाची लागवड चुनखडी , कडक मुरूम , उथळ जमिनीत करू नये.
पेरू –
१. पेरू पिकासाठी हलकी वालुकामय पोयटा , चिकन पोयटायुक्त जमीन उत्तम ठरते.
२. पेरूचे उत्पादन नदीकाठच्या जमिनीत जास्त चांगले येते.
३. जमिनीचा सामू ४.५ ते ८.२ असणाऱ्या जमिनीत पेरू पिकाची लागवड करावी.
डाळिंब –
१. डाळिंब पिकासाठी उत्तम निचरा करणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावीत.
२. या पिकासाठी जमिनीचा सामू ५.५ ते ७ असणारी जमीन उत्तम ठरते.
३. चोपन , क्षारयुक्त ,चिकन मातीच्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये.
लिंबूवर्गीय फळझाडे –
१. लिंबूवर्गीय पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
२. उत्तम पाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनीत हे पीक चांगले येते.
३. चुनखडीयुक्त , चिकन माती , क्षारयुक्त जमिनीत हे पीक घेतल्यास त्यांची वाढ मंदावते.
पपई –
१. उत्तम निचरा करणारी जमीन पपई लागवडीसाठी निवडावीत.
२. जमिनीचा सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असणाऱ्या जमिनीत पपई पिकाची लागवड करावीत.
३. खूप काळ्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये.
आवळा –
१. आवळा पिकाची लागवड क्षारयुक्त , चोपण जमिनीत करता येते.
२. या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ९.५ असणे गरजेचे आहे.
सीताफळ –
१. हलक्या ते वालुकामय पोयट्याच्या जमिनीत सीताफळ पिकाची लागवड करावीत.
२. चिकन मातीत या पिकाची लागवड करू नये.
३. जमिनीचा सामू ६.५ ते ७.६ असणाऱ्या जमिनीत सीताफळाची लागवड करावीत.
जास्त व उत्तम उत्पादनासाठी फळाच्या प्रकारानुसार जमिनीची निवड करावीत. कोणतेही पीक घेण्यापूर्वी जमिनीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.