पालक लागवडीची योग्य पद्धत
महाराष्ट्रामध्ये पालक ही अत्यंत लोकप्रिय पालेभाजी आहे. पालक ही लोह आणि जीवनसत्वे यांनी पूर्णपणे भरलेली भाजी आहे . पालकापासून आपण विविध चविष्ट पदार्थ बनवत असतो जसे भाजी , भाजी , आमटी इत्यादी.
जमीन आणि हवामान –
१. पालकाचे पीक हे अनेक प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते.
२. खारवट जमिनीमध्ये अनेक पिके घेता येत नाहीत परंतु पालक पीक मात्र खारवट जमिनीत ही घेता येते.
३. पालक हे हिवाळी पीक आहे.
४. पालक पीक अत्यंत कमी वेळात घेता येते .
५. महाराष्ट्रामध्ये कडक उन्हाळ्याचे दोन महिने वगळता सर्व महिन्यांमध्ये पालक पीक घेता येते.
६. जास्त तापमानात हे पीक घेतल्यास पलकचा दर्जा खालावतो.
पालकाच्या सुधारित जाती –
भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे पालकाच्या दोन जाती विकसित केल्या आहेत.
१. पुसा हरित
२. ऑल ग्रीन पुसा ज्योती
लागवड –
१. भाजीचा सतत पुरवठा व्हावा या साठी १० ते १५ दिवसांच्या अंतराने हफ्त्या हफ्त्याने बियांची पेरणी करावीत .
२. पालकसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करावेत .
३. त्यानंतर जमिनीवर बिया फेकून पेरणी करावी .
४. त्यानंतर बिया मातीत पेरून त्यावर हलके हलके पाणी द्यावे.
५. दोन बियांमधील अंतर २५ ते ३० सेमी ठेवावे.
६. जर दाट लागवड केली तर पिकांची वाढ पूर्णपणे होत नाही.
७. २५ ते ३० किलो बियाणे प्रति हेक्टर लागते.
खते आणि पाणी व्यवस्थापन –
१. पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागतो .
२. जमिनीत ओलावा राखणे गरजेचे आहे त्यामुळे नियमित पाणी दिले पाहिजे.
३. पालकाच्या पिकासाठी जमिनीला जवळ जवळ २० गाड्या शेणखत , ४० किलो स्पूरद, ४० किलो पालाश आणि ८० किलो नत्र देणे गरजेचे आहे.
४. शेणखत हे पूर्वमशागत करतांना जमिनीत मिसळावे.
५. पानांना हिरवेपणा येण्यासाठी आणि उत्पादन चांगले व्हावे या साठी बी उगवल्यानंतर १५ दिवसांनी आणि कापणी नंतर १.५ % युरिया फावरावा.
६. पिकाला नियमित पाणी द्यावे .
७. ही हिवाळ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
८. काढणीच्या दोन ते तीन दिवस आधी पिकाला पाणी द्यावेत.
९. बियांच्या पेरणीनंतर देखील लगेचच पाणी द्यावे.
काढणी –
१. पेरणीच्या एका महिन्यानंतर पीक कापणीला तयार होते.
२. कापणी करतानाच खराब झालेली पालक वेगळी काढावी .
३. पालकाची जुडी बांधून घ्यावी.
४. जुड्या उघड्या जागेत रचून त्यावर कापड झाकून किंवा बांबूच्या टोपल्यात किंवा पोत्यात ठेवाव्यात.
५. टोपलीच्या खाली किंवा वर कडुनिंबाचा पाला ठेवला तर पालक लवकर खराब होत नाही .
६. जुड्यांवर जास्त प्रमाणत पाणी मारू नये अन्यथा पालक खराब होऊ शकते.
उत्पादन –
१. १० ते १५ टन पर्यंत हेक्टरी उत्पादन होते .
२. तसेच बियाणाचे उत्पादन १.५ टन पर्यंत मिळू शकते .
पालकाचे पोषणमूल्ये आणि मागणी पाहता यांची लागवड मोठ्या संख्येने झाली पाहिजे.