मुळाचे उत्पादन कसे घ्यावे.

Shares

मुळा हा अनेक आजारांवरील उपाय आहे. आपण मुळा कच्चा देखील खाऊ शकतो. मुळा बरोबरच मुळ्यावरील हिरवा पाला याचा देखील वापर भाजी साठी केला जातो.

मुळ्याचे फायदे –
१. कच्चा मुळा खाल्याने भूक जास्त लागते.
२. मुळा पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो.
३. बधकोष्टता असणाऱ्या व्यक्तींसाठी मुळा हा अत्यंत फायदेशीर असा आहे.
४. मुळ्यामध्ये अ आणि क जीवनसत्वे , खनिजे असतात जे आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात.

जमीन आणि हवामान –
१. मुळ्याची लागवड ही रब्बी हंगामात केली जाते.
२. मुळा हे थंड हवामानातील पीक आहे.
३. मुळाच्या काही नवीन जाती विकसित केल्या गेल्या आहेत ज्या उष्ण हवामानात देखील घेता येतात.
४. त्यामुळे आता मुळाचे पीक बाराही महिने आपण घेऊ शकतो.
५. मुळाची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी यासाठी जमीन भुसभुशीत असावी .
६. भारी जमीन असल्यास त्याची चांगली मशागत करावी .
७. चोपण जमिनीत मुळाची वाढ होत नाही .त्यामुळे अश्या जमिनीत त्याची लागवड करू नये.

मुळ्याची लागवड –
१. मुळाच्या पेरणीपूर्वी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे.
२. मुळा लागवड करतानाचे अंतर हे मुळ्याची जात , मुळ्याची वाढ आणि हंगाम यावर अवलंबून आहे.
३. कमी अंतरात लागवड केल्यास मध्यम आकाराचे मुळे मिळतात आणि उत्पादन जास्त होते.
४. मुळांचे १०-१२ किलो बियाणे एक हेक्टरी साठी लागतात.
५. या बियांची पेरणी १-२ सेमी खोलवर करावी लागते.
६. मुळांच्या जातीवर वरंब्यातील अंतर अवलंबून असते.
७. युरोपीय जातीसाठी हेक्टरी अंतर ३० सेमी पर्यंत ठेवावेत.
८. आशियाई जातीसाठी हेक्टरी अंतर ४५ सेमी पर्यंत ठेवावेत.

खत आणि पाणी व्यवस्थापन –
१. मुळासाठी जमीन तयार करतांना चांगले कुजलेले शेणखत २५ टन दर हेक्टर पर्यंत जमिनीत मिसळावे.
२. मुळांच्या पिकाला ३० किलो नत्र , २० किलो स्पुरद आणि ८० किलो पालाश दर हेक्टर द्यावेत.
३. मुळाच्या वाढीसाठी जमिनीत सतत ओलावा असणे गरजेचे आहे.
४. मुळाच्या पिकाला हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी दिले पाहिजे.
५. उन्हाळ्यात मुळाच्या पिकांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी दिले पाहिजे.

आंतरमशागत –
१. जमिनीची मशागत चांगल्या प्रकारे केली गेली पाहिजे कारण मुळाचे पीक कमी अंतर ठेवून लावले जाते.
२. सुरवातीच्या काळात खुरप्याने निंदनी करून पीक वेळेवर तण रहित केले पाहिजे.
३. खोदणी सुरुवातीच्या काळातच करावी.

कीड आणि रोग –
१. मुळाच्या पिकांवर सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारा रोग म्हणजेच करपा आहे .
२. बुरशीजन्य रोगांमुळे मुळाच्या पांनांवर चट्टे पडतात आणि कालांतराने खोडावर पिवळे डाग पडण्यास सुरुवात होते.
३. पावसाळी हंगामात रोगांचा प्रादुर्भाव सर्वात जास्त प्रमाणात होतो.
४. मावा किडी ही पानातील अन्नद्रव्ये शोषून घेते.
५. रोपे पिवळी पडून गळून जातात.
६. काळी अळी ही मुळावरील प्रमुख किडी आहे .
७. काळी अळी मुळाचे पाने खातात आणि त्या मुळे पांनाना छिद्रे पडतात.

एकत्रित रोग व किडी नियंत्रण –
१. काळया अळी वर नियंत्रण आणण्यासाठी १० लिटर पाण्यात २० मिली लिटर इंडोसल्फान मिसळून त्याची फवारणी करावी.
२. मावा किडीचाबंदोबस्त करण्यासाठी १० लिटर पाण्यात २० मिली लिटर डायमिथेईट मिसळून फवारणी करावी.
३. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम डायथेन एम – ४५ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.

मुळा काढणी –
१. मुळा काढणीपूर्वी जमिनीला पाणी द्यावे आणि हाताने मुळा उपटून काढावेत.
२. त्यानंतर मुळा स्वच्छ पाण्याने धुऊन किडलेले वेगळे काढावेत.
३. मुळाची लागवड झाल्यानंतर ४० ते ५० दिवसांनंतर मुळे काढणीसाठी तयार होतात.
४. मुळ्याची काढणी लवकर केली नाही तर मुळा खडसर आणि तिखट होतो .

उत्पादन –
रब्बी हंगामात मुळाचे १० ते २० टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *