इतर बातम्या

सोयाबीनला इतिहासातील सर्वात विक्रमी भाव …

Shares
        सध्या सगळीकडे सोयाबीनचीच चर्चा चालू आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारामध्ये काही दिवसांपासून सोबायीनचा भाव प्रचंड वाढल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपासूनच्या सौद्यात सोयाबीनला ९ हजार ८५१ रुपये एवढा कमाल भाव मिळाला. तर शहरातील तेल उत्पादक कंपन्यांनी मात्र दहा हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली आहे. 

        सोयाबीनच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीनला १०,००० चा विक्रमी भाव मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेंडीची मागणी, वायदे बाजारात होणारे व्यवहार, त्यातूनच कमी असलेली आवक या सर्वाचा परिणाम सोबायीनचे भाव वाढण्यात होत आहे. सोयाबीनचे प्रमुख ठिकाण अशी लातूरची ओळख होताना दिसत आहे. येथील बाजारपेठांमध्ये तर हंगामात दररोज साठ ते सत्तर हजार क्विंटल सोयाबीनची आवक असते. सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रातही सातत्याने वाढ होत आहे.

        मागील अनेक वर्षापासून सोयाबीनला सरासरी चार ते साडे चार हजार रुपये भाव राहिला होता. सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून आंदोलनसुद्धा झाले होते, पण सहा हजारापेक्षा जास्त वाढ कधीच झालेली नव्हती. या वर्षी मात्र कोरोनाच्या संकट काळात सुरवातीपासूनच सोयाबीनच्या भावात तेजी राहिली आहे. आडत बाजारात ऑक्टोबरमध्ये सोयाबीनला कमाल भाव चार हजार १९० रुपये राहिला होता. नंतरच्या प्रत्येक महिन्यात त्यात वाढ होत गेली आहे. फेब्रुवारीमध्ये पाच हजाराचा टप्पा पार झाला आणि मार्चमध्ये सोयाबीन सहा हजारापर्यंत गेले. एप्रिलपासून सोयाबीनच्या भावात कधीच मंदी आली नाही. साडे सात हजार, आठ हजार असा भाव वाढत गेला. यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. 

ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *