जैविक खत मातीसाठी अमृत
मिलिंद जि गोदे – रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीची जडणघडण व गुणधर्म बदलत जाऊन जमीन खराब होते व काही कालावधीनंतर अशा जमिनीत पीक घेणे सुध्दा शक्य होत नाही. जमिनीत दिलेल्या रासायनिक खताची घातक संयुगे निर्माण होऊन जमीन ओसाड व नापीक होत जाते. यासाठी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून वनस्पतींना अन्नद्रव्ये मुक्त करून देण्यासाठी जिवाणूंची “आवश्यकता असते. जिवाणू खते रासायनिक खताच्या तुलनेने स्वस्त असतात व त्यामुळे पिकामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पीक पाण्याचा ताण सहन करू शकते, बियाण्यांची उगवण लवकर व चांगली होते. या सर्व गुणांमुळे जिवाणू खते सेंद्रिय शेतीस वरदान ठरले आहे.
बाजरी 2023: कोडो बाजरीचे भारताशी असलेले नाते 3,000 वर्षे जुने आहे, तो ‘गरीबांचा तांदूळ’ तर कुठे ‘दुष्काळाचे धान्य’ म्हणून प्रसिद्ध आहे
जिवाणू खतांसारखाच गांडुळ खताचा वापर किंवा गांडुळ खताची निर्मिती शेतीस वरदान ठरते. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहून मुळांना प्राणवायूचा भरपूर पुरवठा होतो. ह्यूमसचे प्रमाण वाढते. जमिनीचे फूल सुधारते. जमीन भुसभुशीत राहून मशागत खर्च वाचतो. जलसंधारणशक्ती वाढते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो. शेतीमालाचा दर्जा सुधारतो. वरखताची बचत होते. सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येत वाढ होते. शेतीमाल अधिक टिकाऊ होतो.. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जमिनीमध्ये जीवनसत्वे, प्रतिजैविके आणि संजिवकाचे प्रमाण वाढते. जमिनीचा सामू उदासीन, ६.५ ते ७.५च्या दरम्यान ठेवण्यास मदत होते. गांडुळ ३०% तणांचे बी कुजवतात त्यामुळे तणांचे प्रमाण घटते.
या राज्याचा चांगला निर्णय: मंडईत धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवण मिळणार, सरकारने सुरू केली कॅन्टीन
जिवाणू खत म्हणजे पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्षम जिवाणूंची प्रयोगशाळेत कृत्रिम खाद्यावर मोठ्या प्रमाणात वाढ करून नंतर योग्य अशा माध्यमात मिसळून तयार होणाऱ्या खतास जिवाणू खत म्हणतात. जिवाणू खताला जैविक खत, बॅक्टेरियल कल्चर, बॅक्टेरियल इनाक्युलन्ट, बायोफर्टिलायझर, जिवाणू संवर्धन अथवा मायक्रोबियल फर्टिलायझर अशी अनेक व्यापारी नावे आहेत.
शास्त्रज्ञांनी रेडिएशन टेक्निकच्या सहाय्याने पिकांच्या 56 जातींचा शोध लावला, आता तुम्हाला मजबूत गुणवत्तेसह अधिक उत्पादन मिळेल
जैविक खताच्या प्रकारात मुख्य प्रकार म्हणजे नत्र जैविक खते पिकांना नत्र मिळवून देणाऱ्या जैविक खतांना नत्र जैविक खते म्हणतात. निसर्गाने जमिनीत अशा प्रकारचे सूक्ष्म जिवाणू निर्माण केले आहेत की जे हवेतील नत्र वायूचे अमोनिया स्वरुपात स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. हवेत जवळजवळ ७८% नत्र वायूस्वरुपात असून पिके हा नत्र घेऊ शकत नाही. जमिनीतील ज्या सूक्ष्म जिवाणूमध्ये नायट्रोजिनेज या विकरकाची निर्मिती होत असते असेच सूक्ष्म जिवाणू उदा. काही अणूजीव आणि निळे, हिरवे शेवाळ नत्रवायू स्थिरीकरणाचेकार्य करू शकतात. या क्रियेसाठी ऊर्जाही लागते.
बासमती तांदूळ खरा की खोटा, आता लगेच ओळखता येईल, FSSAI ने नवे मानक ठरवले
नत्र स्थिरीकरणाची क्रिया फक्त प्राणवायूविरहित स्थितीतच होत असते (ॲनरोबिक) अझोटोबॅक्टर, ॲझोस्पायरिलम, रायझोबियम या अणूजिवात तसेच निळे, हिरवे शेवाळांच्या काही जातीत नत्र स्थिरीकरणासाठी सर्व बाबींची पूर्तता होत असल्याने ते हवेतील नत्रवायू स्थिर करून पिकांना मिळवून देऊ शकतात. अँझोटोबॅक्टर मुळांच्या सहजीवी पध्दतीने नत्र वायू स्थिर करतात.हे जिवाणू ज्वारी, बाजरी, गहू, भात, ऊस, सूर्यफुल, कपाशी, भाजीपाल्यांची पिके यासाठी उपयुक्त आहेत. या व्यतिरिक्त हे जिवाणू काही संप्रेरके उदा. इंडॉल अॅसेटिक अॅसिड, जिब्रेलिक अॅसिड, बी व्हिटॅमीन इ. उत्सर्जित करून जमिनीत सोडतात. त्यामुळे पिकाची वाढ होण्यास मदत होते. हे जिवाणू काही बुरशीरोधक द्रव्येही निर्माण करतात. त्यामुळे अल्टरनेरीया, फ्युजॅरिअम, हेलमिन्थोस्पोरिअम, स्कलेराशिअम इ. पिकांवरील रोगकारक बुरशीचा नाश होऊन पिकांना संरक्षण मिळते.
PM किसान योजना: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यावेळी खात्यात 2000 नव्हे तर पूर्ण 4000 रुपये येतील, हे कारण आहे
अझोस्पायरिलम हे जिवाणू सहयोगी पध्दतीने नत्र स्थिर करतात. नत्र स्थिर करण्याच्या क्रियेत अझोटोबॅक्टरपेक्षा हे जिवाणू दीड ते दोन पटीने अधिक कार्यक्षम असतात. तसेच संप्रेरके निर्माण करून पिकाची वाढ जोमाने करण्यासही यांची मदत होते. रायझोबीयम हे जिवाणू कडधान्य व तेलबियाच्या द्वीदल पिकांच्या मुळांवर गाठी निर्माण करून पिकांना उपलब्ध करून देतात……
धन्यवाद
Save the soil all together
युवा शेतकरी व अभ्यासक
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
विचारांची दिशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
लाफिंग बुद्धा घरी ठेवण्याचा योग्य मार्ग कोणता… फायदा काय? जाणून घेऊया
वनस्पती तेलाच्या आयातीत बंपर वाढ, सर्व प्रकारची खाद्यतेल स्वस्त होणार?