सेंद्रिय शेती ही शेती नसुन एक सुधारीत प्रणाली आहे – वाचाच

Shares

मिलिंद जी गोदे – नमस्कार मंडळी आजचा विषय ज्ञान व मार्गदर्शन करणारा आहे.

सेंद्रिय शेती पध्दतीची महत्वाची सूत्रे सारांश रुपाने सांगायची असल्यास जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी लवकर कुजू शकणाऱ्या सर्व तऱ्हेच्या पदार्थाचा सढळ हाताने वापर, द्विदल पिकास आवर्जून स्फुरद घालणे, तण संपूर्णपणे न उपटता है. वरच्यावर कापून त्याचा आच्छादन म्हणून तिथेच वापर करणे, कमीतकमी पूर्वमशागत अथवा अवजाराचा वापर, पाचटाचा आच्छादन म्हणून वापर, पाणी, खत व रासायनिक औषधांचा अनावश्यक वापर टाळून निसर्गचक्रात खीळ बसेल किंवा पडेल असे काही करायचे नाही. अशी बंधने शेतकऱ्याने घालून घेतल्यास त्याला शेकडो वर्षे त्याच जमिनीमध्ये विविध पिके सहज घेता येतात. ह्यूमस निर्मितीत गांडुळाचा मोठा सहभाग असतो.

जैविक खत मातीसाठी अमृत

सेंद्रिय शेती म्हणजे केवल भरखताचा सढळ हाताने वापर असा अर्थ नसून ती एक प्रणाली आहे, तिचा एक विशिष्ट साचा आहे. त्यामागे एक मोठी वैज्ञानिक बैठक आहे. यशस्वी शेतकरी म्हणून जगायचे असेल व कुटुंबाचा आर्थिक पाया बळकट करण्याचा असेल तर सेंद्रिय पध्दतीने पीक घेण्याची संकल्पनाराबवल्याशिवाय तरणोपाय नाही याबाबत सेंद्रिय शेती अभ्यासक व शास्त्रज्ञ फुकुओका यांनी नैसर्गिक शेतीपध्दतीची चार सूत्रे सांगितली.

बाजरी 2023: कोडो बाजरीचे भारताशी असलेले नाते 3,000 वर्षे जुने आहे, तो ‘गरीबांचा तांदूळ’ तर कुठे ‘दुष्काळाचे धान्य’ म्हणून प्रसिद्ध आहे

१) जमिनीची मशागत करायची नाही. नांगरणी नाही.

२) रासायनिक असेंद्रिय खतांचा वापर करायचा नाही.

३) बहुतेक सर्व तज्ञांचे एकमत झाले आहे. अवजारे वापरून अथवा तणनाशके वापरून तणे काढायची नाहीत.

४) कुठल्याही रसायनावर अवलंबून रहायचे नाही.जमिनीतील जिवाणू, गांडुळासारखे प्राणी व पिकाची रोपे यांच्यातील सलोख्याच्या संबंधामुळे हजारो वर्षे जमिनीची सुपिकता पातळी टिकते. एवढेच नव्हे, तर ती वाढतेसुध्दा. याचा आपल्याला विसर पडलेला आहे. निसर्गचक्र सुरळीत चालू राहिल्याने अन्नपुरवठा व्यवस्थित होतो. जैविक समूहामध्ये समतोल राखला जातो. मुळांची चौफेर वाढ व गांडुळांची कार्यक्षमता यामुळे जमिनीची मशागत आपोआप होते. कृत्रिम मशागत थांबवली की तणांची संख्या आपोआप कमी होऊन त्यांची वाढ अगदी मर्यादित राहते व तीसुध्दा मुख्य पिकाला पोषक ठरते. जमिनीत राहणाऱ्या सर्वजणांना मोकळेपणाने राहू द्या आणि त्याच्या बदल्यात निसर्ग तुमच्या पीक वाढीच्या सर्व अपेक्षा पुर्ण करतो.

या राज्याचा चांगला निर्णय: मंडईत धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवण मिळणार, सरकारने सुरू केली कॅन्टीन

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व त्या भागातील हवामानाचे स्वरूप याचे घनिष्ट नाते असते. उष्ण हवामानाच्या प्रदेशात पूर्वमशागतीचे प्रमाण वाढल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणात घट होते. त्याहीपेक्षा जास्त घट हवामानातील बदलामुळे होते. जमिनीची सुपिकता व जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण याचे घनिष्ट संबंध असतात. जमिनीची सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढले की पीक उत्पादन पातळीतही वाढ होते. त्यामुळे जो पदार्थ जमिनीत लवकरात लवकर कुजून जमिनीची सुपिकता वाढवू शकतो, अशा पदार्थांचा व वनस्पतीचा सढळ हाताने वापर करणे हेच अत्यावश्यक ठरते. प्रत्येक सेंद्रिय पदार्थाचे रासायनिक विश्लेषण वेगवेगळे असते. सेंद्रिय पदार्थाचा वापर केल्याने जमिनीच्या गुणधर्मात होणारी सुधारणा ही जमीन प्रकार व सेंद्रिय पदार्थांचे स्वरूप यावर अवलंबून असते…

शास्त्रज्ञांनी रेडिएशन टेक्निकच्या सहाय्याने पिकांच्या 56 जातींचा शोध लावला, आता तुम्हाला मजबूत गुणवत्तेसह अधिक उत्पादन मिळेल

धन्यवाद

विचारांची दिशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे

milindgode111@gmail.com

युवा शेतकरी व अभ्यासक

या 4 प्रकारच्या खिचडी वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात, अगदी टेस्टमध्येही

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *