इतर बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा? नाफेड ची कांदा खरेदी सुरु

Shares

मागील २ महिन्यांमध्ये कांद्याच्या दराचे चित्रच बदलले दिसून येत आहे. हंगामाच्या सुरुवातीला कांद्यास विक्रमी दर मिळत होता. त्यानंतर दरामध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा संकटात सापडला होता. उन्हाळी कांद्याची आवक वाढतच दरामध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली होती.

हे ही वाचा (Read This) निंबोळी अर्क व उपयोग

मात्र आता नाफेड च्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यास थोड्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये २०० रुपयांची वाढ झाली आहे. पहिल्याच दिवशी १५० क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आली.

नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जात आहे?

केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच नाफेड तर्फे धान्याची खरेदी करुन त्याचा साठा केला जातो. जर कधी धान्याची टंचाई निर्माण झाली किंवा वाजवीपेक्षा अधिकचे दर झाले तर हा खरेदी केलेला माल विक्रीसाठी बाहेर काढला जातो.

मागील काही महिन्यापूर्वीच कांद्याच्या दरात वाढ होताच हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हा साठवणूकीतला कांदा मार्केटमध्ये पाठवून दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. पण आता कवडीमोल दर मिळत असतानाच वाढीव दराने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जात आहे.

हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करा ३ वर्षे नो टेन्शन, मिळवा ६ लाखांपर्यंतचे उत्पन्न

शेतकऱ्यांचा होतोय फायदा?

नाफेड मार्फत केंद्र सरकारची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या खरेदीला सुरुवात झाल्याने नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील बल्हेगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरासरीच्या तुलनेत 200 रुपये अधिकचा दर मिळाला.

कांद्याला 965 रुपये इतका प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांने खरेदी केलेल्या कांद्याला बाजार भाव मिळाला होता. त्यातीलच कांदा पुन्हा लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणला असतात त्या कांद्याला नाफेडने 1141 रुपये प्रति क्विंटलला बाजार भावाने खरेदी केला. नाफेडने जास्तीत जास्त कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळवून देण्याची अनिल ताडगे या शेतकऱ्याने त्यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा (Read This) लिचीची लागवड : जाणून घ्या, लिचीच्या सुधारित जाती आणि लागवडीची पद्धत

मागणीच्या तुलनेत देशांतर्गत कांद्याचा पुरवठा अधिक होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत आहे. कांद्याचे सर्वसाधारण बाजारभाव भाव एक हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.

हे ही वाचा (Read This)  राज्यातील ‘या’ शहरात येणारी लाखोंची बनावट दारू जप्त

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *