इतर बातम्याबाजार भाव

कांद्याच्या दरात तफावत, आवक वाढली मात्र भावात चढ उतार सुरु

Shares

यंदा अवकाळी , अतिवृष्टीचा कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून त्याच्या दरात वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याचे दर हे वाढलेले आहेत. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत दिंडोरी व वणी येथील बाजारपेठेमध्ये आता लाल कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या ५ दिवसापासून विविध भागातून २३ हजार ५०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. त्यातील जिप मधून एकूण ८६८ तर ट्रॅक्टर मधून ७९१ क्विंटल कांद्याची आवक झाली. मात्र कांद्याच्या उत्पादनाची सरासरी कमी निघत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

कांद्याचा दरात तफावत

लाल कांद्याला किमान भाव १७०० रुते २००० रुपये तर कमाल भाव हा २९३७ रु. ते ३२९४ रु. दरम्यान आहे. तर एकूण २३५० रु. ते २५५० रुपये इतका सरासरी भाव मिळाला. खाद बाजार किमान भाव ५०० रू. एवढा तर कमाल भाव १३३० रू. ते १८९९ रूयांच्या दरम्यान मिळाला आहे. सरासरी ८०० रू.ते १०५० रु.च्या पर्यंत आहे. गोल्टी लाल कांदा किमान बाजारभाव ७०० रू ते १००० रु.च्यामध्ये आहे, तर कमाल भाव २३११ रू. ते २४०० रुपये दर मिळत आहे. एकूण सरासरी ८०० रू. ते १६०० रुपये आहे.

कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

यंदा अतिवृष्टी, अवकाळी यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून पिकांची जास्त काळजी घ्यावी लागली. तयावर महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. तसेच मिळेल त्या ठिकाणावरून कांदा पिकासाठी भांडवल उभे करून बियाणे, रोपे, लागवड , औषधे, फवारणी आदी सर्व खर्च यंदा जास्त प्रमाणात झाला आहे. मात्र जे उत्पानांची सरासरी मिळायला हवी तेवढी मिळत नसल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *