इतर बातम्यापिकपाणी

आता शेतीची नवीन पद्धत कुंड्यातील शेती, कमी खर्चात अधिक नफा

Shares

सध्या शेतकरी शेतीमध्ये आगळे वेगळे प्रयोग करत आहेत. याचे कारण म्हणजे सततचे बदलते वातावरण, आधुनिक बदलाव तसेच उत्पन्नामध्ये होणारी घट. असाच एक आगळा वेगळा प्रयोग पारंपरिक शेती करणारा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

चक्क मातीमध्ये जलबेरा फुलाची लागवड न करता त्यांनी फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुंडींमध्ये हे पीक घेतले आहे. इतकेच काय त्यांनी या प्रयोग ३० गुंठ्यात २२ हजार कुंडयांचा वापर करून केला आहे.

हे ही वाचा (Read This )  आधुनिक शेती काळाची गरज, व्हर्टिकल फार्मिंग

तालुक्यामधील बोर्ड येथील चव्हाण बंधू आणि त्यांचे शेजारी मित्र करंडे यांनी हा प्रयोग केला आहे. त्यांनी या नवीन टेकनिक चा वापर करून त्यांचे शेत खुलवले आहे.

त्यांनी सुनियोजित पद्धतीने ३० गुंठ्यात १ महिन्यापूर्वी जरबेरा फुलाची लागवड केली असून त्यांना लागवड आणि उदान खर्च कमी लागला असून त्याबरोबर जास्त मेहनत देखील नाही करावी लागली. त्यांच्या या प्रयोगाची चर्चा सगळीकडे चांगलीच रंगली आहे.

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

२२ हजार कुंडल्या कर्नाटक मधून आणल्या ..

मातीच्या बेड वर आजपर्यंत अनेकांनी जरबेरा फुलशेती केली आहे. या शेतीमध्ये जोखीम तसेच खर्च वाढला. त्यात शेतीसाठी लागणारे शेणखत व गेरू माती मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे यांनी मातीच्या बेड ला फाटा देत कुंड्यांमध्ये फुलशेती फुलवली आहे.

यासाठी लागणाऱ्या लाईट वेट कुंड्या त्यांनी कर्नाटक मधून मागवल्या असून त्यांनी या लोखंडी स्टॅन्ड वर बसवल्या आणि त्यामध्ये जरबेरा ची शेती फुलवली.

हे ही वाचा (Read This ) शेतीतील एक वेगळा प्रयोग, या पिकाची लागवड करून घ्या चांगले उत्पन्न

त्यांनी पुणे येथून प्रत्येकी ४० रुपये प्रमाणे असे २२ हजार ५०० जरबेराची रोपे आणली. त्यांनी ही रोपे कोकोपीटच्या साहाय्याने लावली . या पिकांना दिवसातून ३ वेळा ड्रीपने २४० मिली पाणी दिले जाते. तसेच वेळोवेळी त्यांना खत, औषधे दिली जात आहेत.

या पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी येतो असेच प्लॉटचे आयुष्य वाढेल असे चव्हाण बंधूंनी सांगितले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *