विषमुक्त शेती काळाची गरज
आपण शेतीला सुरवात केली त्यावेळी मला वाटतं एवढी विषारी शेती नव्हती जेवढी आज आपण करुन ठेवलीय. आपल्या वाडवडीलांना त्यांची इच्छा नसतांनीही त्यावेळच्या सरकारने बळजबरीने रासायनीक खते व औषधे वापरायला लावलीत.पीककर्ज गावातील सोसायटी मधुन देन्यात येत होते.मग त्या ठीकानी काही खते,औषधे व काही पैसे अशापध्दतीने पीक कर्ज मीळायचे.पण आज परीस्थीती बघा कुठे गेलीय. त्यावेळेस बळजबरीने दीलेल्या खते व औषधांची आपण सवय करुन बसलो.कारन आज शेतकर्यानमधे आज जास्त उत्पन्न काढायची स्पर्धा लागलीय.कोन गावात जास्त उत्पन्न काढतेय,कुनाच्या नावाचा डंका वाजतोय हेच जीकडेतीकडे चालु झालय.पण उत्पन्न वाढविन्यासाठी आपण बाकीचा काहीच विचार केला नाही. रासायनिक खते, कीटकनाशके, शेती औजारामधील आधुनीकीकरन याने पुढे काय नुकसान होईल याचा विचार करण्यासाठी कधी कुणाला वेळच मिळाला नाही, कधी कोणी मागे वळुन बघीतलेच नाही.
पण…..
आज आपण जे करुन ठेवलंय त्याचे परीणाम दिसायला लागलेत. याचे परीणाम सुध्दा असे आहेत की अगदी मन सुन्न करुन टाकतात. रासायनीकच्या अती वापरामुळे आपली शेत जमीन न पीकनारी करुन ठेवलीय, या पंचक्रोशीतील सर्वच नागरीकांना त्यामधे लहान मुल असो,जवान मानुस असो,की वयोवृध्द नागरीक असो सर्व नविन नवीन बीमार्यांच्या विळख्यात सापडले आहेत. ज्या बिमारीचे कधी नावही एैकले नाहीत अशा नवनविन बिमार्या उभ्या झाल्यात.क्षणात माणसाला मरण, अर्धमरन, अपंगत्व, आंधळेपणा अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागत आहे. कोण जबाबदार आहे हो ह्या सर्व गोष्टीला?
जरा विचार करा..
काही वर्षांपूर्वी एक मन सुन्न करणारी घटना यवतमाळ जिल्ह्य़ात घडली पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही काय झाले तर यवतमाळ जिल्ह्य़ात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकर्यांना विषबाधा झाली. यामध्ये 19 शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. तर 25 शेतकर्यांना कायमचा दृष्टीदोष निर्माण झाला आहे. काही शेतकर्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम झाला आहे. या कीटकनाशकांमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांमुळे रुग्णालयात काही रुग्णांना बांधून ठेवण्यात आले आहे. तर 750 च्या वर शेतकरी उपचार घेत आहेत. दररोज फवारणीने विषबाधा झालेले 30 ते 35 शेतकरी रुग्णालयात दाखल होत आहेत. सध्या बाजारात बनावट कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या शेकडो कंपन्या आहेत. त्यापैकी काही कंपन्या या विविध नामांकित कंपन्यांच्या ब्रँडच्या नावाने विषे विकतात. हुबेहुब पॅकिंग करतात. काही दुकानदारांना जास्त कमिशनचे आमिष दाखवून विक्री करतात. बनावट विषाला आळा घालण्यात अद्याप सरकारला यश आलेले नाही. सर्वांचा फायदा होतो पण प्रत्येक वेळी बळी जातो तो शेतकऱ्यांचाच. एवढं करूनही यश किती शेतकऱ्यांच्या पदरी पडले, भरमसाठ उत्पन्नाच्या नादात शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर चढला,परिणामी शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या,कोणी शेती विकू लागले,पण हमखास उत्पन्न मात्र निघाले नाही. जेव्हा हमखास उत्पन्न झाले त्यावेळी सरकारी धोरण शेतकऱ्याच्या आडवे आले. नापिकी मुळे शेतकर्यांची झालेली अवस्था पाहून डोळ्यात पाणी येते,मनातल्या मनात शेतकरी रडतो,त्याच दुःख ऐकायला सुद्धा कोणी नसतं.
जीव चाललेत पण तरीही विषारी औषधांचा नाद सोडायचा नाही, त्यावर विचार करायचा नाही,का….?
एवढा स्वस्त आपला जीव कसाकाय करुन ठेवला की मुठभर जास्त उत्पन्नासाठी अख्खा जीवच गमवावा.. विचार करा खरोखर रासायनीक खते,व कीटकनाशके वापरले तरच शेती पीकते नाही वापरले तर पीकनार नाही का? थोडा विचार तर करा, विषमुक्त शेती करु शकतो का? रासायनीक शेतीपेक्षाही जास्त उत्पन्न देनारी विषमुक्त शेती आहे. एवढ्या सर्व निरपराध लोकांचा विनाकारन आपण बळी घेतल्यापेक्षा, त्यांना कायमचे अपंगत्व दील्यापेक्षा, त्यांना विषारी अन्न खावु घातल्यापेक्षा विषमुक्त शेती करा व या भारतातील प्रत्येक नागरीकाला विषमुक्त अन्नाची थाळी खान्यास मदत करा ज्यावर प्रत्येक नागरीकाचा अधिकार आहे.शेतकरी बांधवांनो सावध होण्याची आता वेळ आली आहे. कारण हे रासायनिक शेतीच संकट आपल्या घरापर्यंत येऊन ठेपले आहे. आपण संघटीत होण्याची आवश्यकता आहे. विषारी कीटकनाशके, तणनाशके, रासायनिक खते यांच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी विषमुक्त शेती कडे वळणे गरजेचे आहे. बाहेरुन शेतात विकत आणण्यापेक्षा शेतातच नैसर्गिक खते, देशी बियाणे, नैसर्गिक कीटकनाशके बनवून शेती केली पाहिजे. शिवार ते ग्राहक अशी शेतमालाची वितरण व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रो कंपन्या तसेच शेतकरी गट निर्माण केले पाहिजेत.
विषमुक्त शेती करुन सन्मानाचे जीवन जगा.
तुम्हीही जगा व इतरांनाही निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत करा.
शेती शिक्षण हाच शोषण थांबवण्याचा खरा मार्ग.
राहुल साहेबराव उभाले
Rahul4patil1212@gmail.com
हे ही वाचा ( Read This) या पिकाची लागवड करून मिळवा ३ लाख ३ महिन्यात, मिळणार ७५% सरकारी अनुदानही