इतर बातम्या

वीजग्राहकांना व्याज आणि विलंब शुल्क माफ, नितीन राऊतची घोषणा

Shares

कोरोनाच्या काळात सर्वजण घरी असल्यामुळे सर्वांनाच भरमसाठ बिल (electricity bill) आले असून अजूनही लोक ते बील फेडण्यासाठी धडपड करत आहेत. अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नवीन घोषणा केली आहे. जर, एक-रक्कमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ केले जातील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.

वीज कनेक्शन कापू नये या भीतीने टप्याटप्याने भरले जात आहे वीज बिल…

कोरोनाच्या काळात मिटर बंद असल्यामुळे एकाच वेळी वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात आले होते. त्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला होता. काही ठिकाणी तर चक्क वीज मिटर नसतानाही बिलं आली होती. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर चहुबाजूने टीका केली जात होती. अजूनही काही ठिकाणी वीज ग्राहक आपली वीज कनेक्शन कट होऊ नये म्हणून टप्याटप्याने वीज बिल भरत आहेत.

नितीन राऊत यांनी काय केली घोषणा ?

जर वीज ग्राहकांनी एक-रक्कमी थकबाकी भरले तर सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास ५ टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. त्याचबरोबर लघुदाब वीज ग्राहकांनी एक रक्कमी वीज बिल भरल्यास १० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे, अशी घोषणाही राऊत यांनी केली.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *