मोत्याची शेती करून कमवा बक्कळ पैसे
दिवसें दिवस भारतातील काही राज्यांमध्ये मोत्याच्या लागवडीचा कल वेगाने वाढत आहे. मोत्याच्या शेतीतून कमी मेहनत करून अधिक नफा मिळतो.
मोती कसा तयार करता येतो –
प्रथम ऑयस्टरंना जाळीमध्ये बांधले जाते आणि १० ते १५ दिवस तलावामध्ये ठेवले जाते, जेणेकरून ते त्यानुसार त्यांचे वातावरण तयार करू शकतील. त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाईल आणि शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रिया म्हणजे ऑयस्टरच्या आत एक कण किंवा चार ते सहा मी. व्यास वाले डिझाईन बीड सारखे गणेश, बुद्ध, पुष्पा च्या आकाराचे साचे घातले जाते. त्यांना नायलॉनच्या बॅगेत ठेवून बांबू किंवा बॉटल च्या साह्याने लटकवले जाते. तलावाच्या एक मीटर आत सोडले जाते. या बुरशीवर कोटिंग केल्यानंतर ऑयस्टर थर बनविला जातो, जो नंतर मोती बनतो.
खर्च, उत्पन्न आणि नफा –
एक ऑयस्टर तयार करण्याकरता २५ ते ३० रुपये खर्च येतो तर तयारी नंतर ऑयस्टरमधून दोन मोती बाहेर पडतात आणि एक मोती किमान १२० रुपयांना विकला जातो जर गुणवत्ता चांगली असेल तर आपल्याला २०० रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. जर तुम्ही एका एकराच्या तलावांमध्ये २५००० सिंपले टाकले तर त्याची किंमत ८ लाख रुपये होईल.सध्या डिझाईन मोतीना खूप मागणी असून त्यांना बाजारात खूप दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशातील बाजारापेक्षा परदेशात मोत्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केला जाते. इतकेच काय शिंपल्यांनाही बाजारात मोठी मागणी असते.शिंपल्यांपासून सजावटीच्या वस्तू तयार केल्या जाता. शिंपल्यांपासून कन्नोज मध्ये परफ्यूम तेल काढले जाते.
मोत्याच्या शेतीचे प्रशिक्षण –
सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर (ओडीसा) येथे मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना मोती उत्पादनाचे प्रशिक्षण देते.