रोग आणि नियोजन

मोसंबी पिकावरील महत्वाच्या रोगावर नियंत्रण

Shares

महाराष्ट्रामध्ये मोसंबी पिकाची लागवड मोठ्या संख्येनें केली जाते. मोसंबी लागवड ही कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देते. मराठवाड्यातील हवामान मोसंबी पिकासाठी उत्तम ठरते. परंतु मोसंबी पिकावर डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर पीक बरोबर मोसंबीचे नुकसान होते. आपण डिंक्या रोगाची लक्षणे तसेच त्यावर उपाययोजना ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

डिंक्या रोगाची लक्षणे –
१. रोपवाटिकेतील मुळे कुजून झाडाची वाढ खुंटते.
२. रोपवाटिकेतील काही रोपे कोलमडून पडतात तर काही रोपे रोपवाटिकेतच मरतात.
३. झाडाची पाने पिवळी पडून गळण्यास सुरु होतात. त्यानंतर खोडावर डिंक स्त्रवतो.
४. जमिनीलगत असणाऱ्या खोडावर रिंगण तयार होते. खोडाच्या सालीवर डाग पडतात.
५. डिंक्या रोग हा मुळामध्ये घुसतो. त्यामुळे मुळे कुजतात.
६. खोडाची साले सुटण्यास सुरुवात होऊन खोडाचा भाग उघडा पडतो.
७. या रोगाची सर्वात जास्त लक्षणे खोड तसेच फांदीवर दिसून येते.
८. डिंक असलेल्या सालीचा भाग गडद लाल रंगाचा होऊन तो वाळल्यानंतर सालीला उभ्या चिरा पडतात.

डिंक्या रोगावर उपाययोजना –
१. डिंक्या रोगाची बुरशी जमिनीत राहते. त्यामुळे संपूर्ण पिकास धोका उध्दभवतो परंतु योग्य मशागत केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
२. वर्षातून २ वेळा पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट जमिनीपासून ३ ते ४ फूट उंचीपुर्वी खोडास लावावे.
३. बोर्डो पेस्टचा अवलंब करतांना साल काढलेल्या जागेवर मेटीलकीझल किंवा कासेटिल एल या बुरशीनाशकाचा मलम लावावा.
४. डिंक्या रोग रंगपूर लाईम रोगास सहनशील आहे. त्यामुळे या रोगप्रतिकार खुंटाचा वापर करावा.

मोसंबी पिकाचे सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या डिंक्या रोगाचे वेळीच लक्षणे ओळखुन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Shares