रोग आणि नियोजन

मिरचीवरील चुरडा मूरडा रोगाचे व्यवस्थापन

Shares

मिरची पिकावर चुरडा मुरडा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा एक विषाणूजन्य रोग असुन त्यामुळे पानावर पिवळसर व हिरव्या रंगाचे डाग पडतात व पाने बारिक व वेडीवाकडी होतात अशा पानाचा गुच्छा तयार होऊन रोगट फांदीला झुपक्याचा आकार येतो. नविन फुटीचे छोटया पानात रूपांतर होऊन गुच्छा सारखे दिसतात व झाडाची वाढ पुर्णपणे खुंटते व उत्पादनात ४० ते ५० टक्क्या पर्यंत नुकसान होऊ शकते. या रोगाचा प्रसार रस शोषण करणाऱ्या किडीमुळे होतो म्हणुन मिर्ची पिकावर येणाऱ्या मावा, फुलकिडे, पांढरी माशी व कोळी या किडींबद्दल माहिती व व्यवस्थापनाचे उपाय करणे गरजेचे आहे.

मिरची पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडी व त्यांचे उपाययोजना

मावा:

हि किड काळया किंवा पोपटी रंगाची असते. हया किडींची पिल्ले पंख विरहीत तसेच प्रौढ पंखासहित आढळतात. किड शेंडयावर पानावर खालच्या बाजूस राहून पानातील रस शोषूण घेते त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व पाने निस्तेज दिसतात. तसेच हि किड आपल्या शरीरातून चिकट द्रव्य बाहेर सोडते त्यावर उष्ण व दमट हवामानात काळया रंगाची बुरशी वाढुन प्रकाश संश्लेषन कियेत अडथळा निर्माण होते, अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊन झाडाची वाढ खुंटते. या किडीची जिवन चक १० ते १२ दिवसात पुर्ण होते व एका वर्षात १२ ते १४ पिढया सहज पुर्ण होतात.

पांढरी माशी:

पांढऱ्या माशीचे शरीर पिवळे व पंख पांढरे असतात, ती पानातून व फुलातून रस शोषन करून नुकसान पोहचविते. वाढलेले तापमान व आर्दता या किडीच्या वाढीस पोषक आहे. या किडीचे जिवनचक २५ते ३५ दिवसात पूर्ण होते तर वर्षाभरात ९ ते १० पिढया पूर्ण होतात.

फुलकिडे:

हि किड अतिशय सुक्ष्म असुन तिचे शरीर लांबट आकारचे असते. किड पानावर तसेच फळावर पेशी खरबडून त्यातुन निघालेला रस शोषुन घेते त्यामुळे पाने वेडीवाकडी होतात तर फळावर खरबडल्यासारखे चट्टे दिसतात झाडाची वाढ थांबुन पाने व कळयाची गळ होते.

कोळी:

हि अष्टपाद वर्गातील किड असुन आकाराने अतिशय सुक्ष्म असते. पिवळसर रंगाचे कोळी पानावर राहून रस शोषुन घेतात. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाची पाने खालच्या दिशेने वाकडी होतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास झाडाची वाढ खुंटते तसेच फुले व कळया गळण्याचे प्रमाण वाढते.

व्यवस्थापन :

१.पेरणीपूर्वी गादीवाफ्याला पाणी देऊन ०.४५ मिमि जाड प्लास्टिकच्या शिटने तिन आठवडे

झाकुन ठेवावे. त्यामुळे उष्णतेने मातीचे निरजंतूकरण होते व मातीमधील हानीकारक बुरशी तसेच किडीची नायनाट होतो.

२.पांढऱ्या माशीच्या व्यवस्थानासाठी पिवळया रंगाचे तर फुलकिडयासाठी निळया रंगाचे

चिकट सापळे लावावेत.

३.शेताच्या चहूबाजुनी मका, चवळी व झेंडू च्या तिन ओळी लावाव्या या पिकांवर क्रायसोपा, लेडी बर्ड बिटल इत्यादी परभक्षी किटकाची वाढ होऊन रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणास मदत होते.

४.सुवातीच्या अवस्थेत चुरडा मुरडा रोगग्रस्त झाड आढळल्यास त्वरीत उपटून नष्ट करावे

जेणेकरून पुढील प्रादुर्भावास अटकाव करता येईल.

५.नत्र युक्त खताचा वापर शिफारशीत मात्रेतच करावा.

६.मिरची पिकाचे वेळोवेळी सर्वेक्षण करून रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच.

घरी तयार केलेल्या ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

७. रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थानासाठी इमीडाक्लोप्रीड ७० टक्के डब्ल्युएस १०

ग्रॅम किंवा थायोमेक्थाझाम ३० एफएस ७ मिली प्रती किलो बियाणे या प्रमाणे बिज प्रक्रिया करावी.

८.रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावयाची असल्यास शिफारशीत किटकनाशके.

जसे डायमेथोएट ३० ईसी १४ मिली किंवा फिप्रोनील ५ एससी २० मिली किंवा फेनप्रोथिऑन ३० टक्के ३.५ मिली किंवा इथिऑन ५० ईसी ४० मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

९.एकचएक किटकनाशक पुन्हा पुन्हा न वापरता आलटून पालटून वापरावे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *