माझी कन्या भाग्यश्री योजना २०२२, मिळणार ५० हजार- असा करा अर्ज
माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१६ ला सुरु केली होती. महिलांना प्रोत्साहन देण्यास्तही तसेच त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सरकार ५० हजार रुपये मुलीच्या नावावर जमा करणार आहे. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजनाचा अवलंब केला असेल, तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे २५ हजार ते २५ हजार रुपये या प्रमाणे बँकेत जमा केले जातील.
एका व्यक्तीस २ मुली असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र पहिल्या मुलीच्या जन्मानंतर त्यांना १ वर्षाच्या आत नसबंदी तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ६ महिन्याच्या आत करावी लागणार आहे.
ही वाचा (Read This ) महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022- यासाठी असा करा अर्ज
पूर्वी ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच याचा लाभ घेता येत होता मात्र आता ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अनेक ठिकाणी आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे मुलींना शिक्षण दिले जात नाही त्यामुळे ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांना ३ मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
हे ही वाचा (Read This ) शेताच्या बांधावर या झाडाची लागवड करून कमवा लाखों रुपये
आवश्यक कागदपत्रे
१. महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र
२. आधारकार्ड
३. मोबाईल क्रमांक
४. पासपोर्ट साईज फोटो
५. मुलीच्या नावाचे बँक खाते पासबुक
६. जन्माचा दाखल
ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा
अर्ज कसा करावा ?
१. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
२. त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज डाउनलोड करावा लागेल .
३. त्या अर्जामध्ये विचारण्यात आलेली माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
४. तुमचे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून तुमच्या जवळील महिला व बालविकास केंद्रामध्ये जमा करावे लागेल.
अधिकृत संकेतस्थळ