महाराष्ट्रातील मुख्य पीक तूर लागवड पद्धत
तूर भारतातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. भारतातील ३२.६५ लाख हेक्टर क्षेत्र तर महाराष्ट्रातील ११.८१ लाख क्षेत्र तूर लागवडीखाली आहे. खरीप हंगामातील तूर हे अत्यंत महत्वाचे पीक मानले जाते. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तुरीचे पीक आंतरपीक म्हणून देखील घेतले जाते. आपण जाणून घेऊयात तूर पिकाची लागवड कशी करावी.
जमीन व हवामान –
१. तूर पिकाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत करता येते.
२. उत्तम पाण्याचा निचरा करणारी जमीन या पिकास निवडावीत.
३. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
४. जमिनीत कॅल्सिम , स्फुरद, गंधक यांची मात्रा मुबलक प्रमाणात असायला हवी.
५. तूर पिकाच्या वाढीच्या काळात दमट , आद्रता असणारे वातावरण पोषक ठरते.
६. वार्षिक सरासरी ७०० ते १००० मी मी पर्जन्यमान असणाऱ्या भागात या पिकाची वाढ उत्तम होते.
७. पहिल्या दीड महिन्यात या पिकास नियमित पाऊस असणे आवश्यक आहे.
पूर्वमशागत –
१. लागवडीपूर्वी जमीन भुसभुशीत खोल नांगरट करून घ्यावी.
२. जमिनीवरील धसकटे , काडीकचरा वेचून घ्यावा.
३. खोल नांगरणी केल्यानंतर जमीन उन्हात तापू द्यावी जेणेकरून बुरशी , कीटक , जिवाणूंचा नाश होईल.
सुधारित जाती-
१. डी. डी. एन – १
२. विपुला ए .के. टी-८८११
३. आय. पी. पी. एल – ८७ (प्रगती )
४. आय. पी. पी. एल- १५१ ( जागृती )
५. बी. डी. एन. -२
पाणी व्यवस्थापन –
१. तुरीच्या पिकात पाणी साठून राहिले तर रोपे मरतात. त्यामुळे कोळपणीद्वारे सऱ्या पाडून घ्याव्यात.
२. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात दुप्पटीने वाढ होते.
३. पीक फुलोऱ्यात असताना व शेंगात दाणे भरतांना ३ पाण्याच्या पाळ्या दिल्यास उत्पादनात वाढ होते.
काढणी-
१. तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे.
२. पीक चोपून बसण्यासाठी पेंढा बांधावा.
उत्पादन –
१. तुरीचे सलग पीक घेतले तर तर १६ ते १८ क्विंटल प्रति हेक्टर प्रमाणे उत्पादन मिळते.
२. बागायत सलग पिकापासून २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
भारतात तुरीचे जास्त महत्व आहे. तुरीची मागणी देखील जास्त प्राणात आहे. तुरीच्या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यापासून उत्तम उत्पादन मिळते.